Join WhatsApp group

अकोला महानगरपालिकेतील लिपिक लाच घेताना रंगेहात अटक

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला : दिनांक २९ ऑगस्ट २५: अकोला महानगरपालिकेच्या जन्ममृत्यू विभागातील प्रभारी लिपिक चंद्रकांत माणिकराव अधनकर (वय ४४) यास अँटी करप्शन ब्युरोने (ACB) ३०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

तक्रारदाराने आपल्या तीन मुलांच्या जन्म प्रमाणपत्रांवरील नाव, आधार कार्ड व पत्ता दुरुस्तीकरिता महानगरपालिकेत अर्ज दाखल केला होता. या कामासाठी प्रभारी लिपिक जगगनकर यांनी ३०० रुपयांची लाच मागितली.

तक्रारदाराने ही बाब नाकारून २८ ऑगस्ट रोजी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली.तक्रारीनंतर पडताळणी कार्यवाही दरम्यान आरोपी लिपिकाने लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर २९ ऑगस्ट रोजी अकोला महानगरपालिकेत राबविण्यात आलेल्या सापळा कारवाईत त्याने पंचासमक्ष ३०० रुपये स्वीकारले.

त्यानंतर त्याला तत्काळ ताब्यात घेण्यात आले असून सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मा. श्री. मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. सचिंद्र शिदि व पोलीस उपअधिक्षक श्री. मिलिंदकुमार बहाकर यांच्या देखरेखीखाली, पोलीस निरीक्षक प्रविण वेरूळकर, अतुल इंगोले व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

👉 नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने खाजगी व्यक्तीने शासकीय कामाकरिता लाच मागितल्यास त्वरित अँटी करप्शन ब्युरो, अकोला येथे कळवावे असे आव्हान श्री. मिलिंदकुमार बहाकर यांनी केले आहे.

संपर्क :📞 ऑफिस फोन – ०७२४-२४१५३७०📞 टोल फ्री क्रमांक – १०६४📱 मोबाईल – ९४०३८०१०६४


Share

Leave a Comment

error: Content is protected !!