Join Whatsapp

अकोल्यात ५ लाखांचा बनावट नोटा हेराफेरी करणाऱ्यांना टोळीवर कारवाई

Photo of author

By Sir

Share

प्रेमराज शर्मा – अकोला शहर (एम आय डीसी) पोलीस ठाणेदार वैशाली मुळे यांना गुप्त माहिती मिळाली कि पिकेवी जवळ एक टोळी नकली नोटांचा गैरव्यवहार करणार आहे, त्या आधारे सूक्ष्म नियोजित पद्धतीने याचा सापळा रचण्यात आला. सायंकाळी ५.३० सुमारे महाबीज कार्यालय समोर पोलिसांना काही संदिग्ध हालचाल दिसून आली.

सुनियोजित पद्धतीने सापळा रचून आरोपींना पकडण्याचे प्रयत्न पोलसांनी केले ,पण मात्र पोलिसांना पाहून त्यातील आरोपी तेथून फरार झाल्याचे समजते पण मात्र एका आरोपीला पकडण्यास पोलिसांना यश मिळाले. त्याजवळ ५ लाखांचा बनावटनोटा ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.

प्रार्थमिक माहितीचा आधारे अमरावती वरून दोन इसम हे अकोल्यात आले त्यांना एक लाखाचा असली नोटाच्या बदल्यात ५ लाखांचा बनावट नोटा देण्याची डील झाल्याचे समजते. सध्या या प्रकरणाची कारवाई अकोला शहर (एम आय डीसी) पोलीस ठाणेदार वैशाली मुळे, या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहे.

आरोपिंना पकडण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका पोलीस कर्मचारी डबीचे अंभोरे, उमेश इंगळे, सतीश इंदोरे, ट्राफिक कर्मचारी रवी चव्हाण व उपलकर, यांनी पार पाडली.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!