Join WhatsApp group

अकोला स्थानीक गुन्हे शाखेचा ‘प्रहार’: गोवंश तस्करांवर मोठी कारवाई

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला | २७ जून २०२५

अकोला स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांनी आज भल्या पहाटे मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत २३ गोवंश जनावरांची सुटका केली. सदर जनावरे निर्दयतेने वाहतूक केली जात होती. यामध्ये दोन पिकअप वाहने व एक मोटरसायकलसह एकूण ₹२३,७५,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक मा. श्री. अर्चित चांडक यांच्याद्वारे गोवंश तस्करी रोखण्यासाठी विशेष सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख श्री. शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथकांनी समृद्धी महामार्गावर सापळा रचून नागपूरहून येणाऱ्या दोन पिकअप वाहनांना अडवले.

ही वाहने जुने शहर हद्दीत प्रवेश करत असताना अडवण्यात आली. तपासणी दरम्यान एम.एच. ३० बी.डी. ५६८६एम.एच. ३१ एफ.सी. २४८९ या क्रमांकांच्या वाहनांमध्ये गाय, गो-हे, कालवड अशा एकूण २३ गोवंश जनावरांची निर्दयीपणे कोंबून कत्तलीसाठी वाहतूक करत असल्याचे आढळले.

सदर जनावरांना तत्काळ सुखरूप बाहेर काढून उपचार व संगोपनासाठी आदर्श गौसेवा संस्था, म्हैसपूर येथे हलवण्यात आले.

आरोपी व जप्त सामग्री:

या कारवाईदरम्यान खालील व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे:

  1. सकलेन मुस्ताक मोहम्मद आरीफ कुरेशी, वय २५, ताजनापेठ, अकोला
  2. लोकनाथ मुग्णास्वामी पिल्ले, वय २५, कामठी, नागपूर

फरार आरोपी:
3. गुल मोहम्मद शेख बाबु, वाशिम बायपास, अकोला
4. मोहम्मद अल्तमश मोहम्मद हबीब (कुरेशी), ताजनापेठ, अकोला

या सर्वांविरुद्ध जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जप्त मुद्देमाल:

  • २३ गोवंश जनावरे: ₹५,७५,०००/-
  • पिकअप वाहन क्रमांक:
    • MH-30-BD-5686: ₹८,५०,०००/-
    • MH-31-FC-2489: ₹८,५०,०००/-
  • दुचाकी (HP SHINE, MH-30-BP-8072): ₹१,००,०००/-

एकूण जप्त मुद्देमाल: ₹२३,७५,०००/-

कार्यवाही करणारे अधिकारी:

या यशस्वी कारवाईत खालील अधिकारी व पोलीस कर्मचारी सहभागी होते:

  • पो. नि. श्री. शंकर शेळके
  • सपोनि विजय चव्हाण
  • पो.उप.नि. गोपाल जाधव, माजीद पठाण, विनोद ठाकरे
  • पोलीस अंमलदार: शेख हसन, उमेश पराये, भास्कर धोत्रे, गोकुळ चव्हाण, खुशाल नेमाडे, श्रीकांत पातोंड, चिरज वानखडे, आकाश मानकर, अभिषेक पाठक, मोहम्मद आमीर

यापुढेही अशा अवैध गोवंश वाहतुकीवर कठोर कारवाईचे संकेत अकोला स्थानीक गुन्हे शाखेचे निरीक्षक शंकर शेळके यांनी दिले आहेत.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!