Join Whatsapp

अकोला जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेने केला ड्रग्स बनविण्याचा कारखाना उध्वस्त, ३ कोटीचे मुद्देमाल जप्त

Photo of author

By Sir

Share

प्रेमराज शर्मा – २४ ऑक्टो २४ – बर्शिटाकली येथे एक महागाव रोड वरील एक बंद जिनिंग कारखान्यामध्ये अमली पदार्थ बनविण्याची प्रक्रिया सुरु असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांना प्राप्त झाली, माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांचा सोबत एक टीम गठीत करून त्वरित कारवाई करण्यासाठी बर्शिटाकली येथे निघाले.

कारखान्यावर धाड टाकली असता पोलीसांना सुद्धा धक्का बसला तेथे अमली पदार्थ तयार करण्याची संपूर्ण प्रयोगशाळाच होती, प्रयोगशाळेत सिरामिक फनेल, काचेचे चमु , स्टैन्ड, मोजमाप करण्यासाठी लागणारे विविध मापे, वेक्क्युम मोटर, स्टीर, अशे अनेक उपकरण जप्त केले.

या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करत असताना हे कारखाने मो.शफी यांची आहे तसेच मुख्य आरोपी आदिल मो. शमीम अन्सार (३६ वर्ष ) आहे तसेच श आरोपी पवन माणिक मुदनदर, (३० वर्ष मुंबई ) निरास नियाजी मुख्तार नियाजी (४५ वर्ष अकोट फील अकोला ) मो. इरफान मो.युसुफ ( ४० वर्ष गंगा नगर अकोला ) फिरोज खान शब्बीर खान (५० वर्ष गंगा नगर अकोला ) यातील मुख्य आरोपी आदिल मो. शमीम अन्सार या वर हैद्राबाद येथे २०१४ मध्ये आतापुरा पोलीस स्टेशन व २०१७ मध्ये मुंबई येथे अमली पदार्थ तयार करण्याचे गुन्हे दाखल आहे.

संपूर्ण कारवाई अंतर्गत पोलिसांनी अमली पदार्थ वहातुक करण्यासाठी लागणारी चार चाकी गाडी तसेच अमली पदार्थ इफीड्राइन (५.५४८ किलो ) असा एकूण २,३८,७०,००० रुपयाचे मुद्देमाल जप्त केले.

कारवाई करताना मा. पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, मा अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांचा मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके ,गोपाल जाधव, दशरत बोरकर, गणेश पांडे, राजपालसिंग ठाकुर, फिरोज खान, उमेश पराये, आकाश मानकर, धीरज वानखडे, मो. अमीर, अभिषेक पाठक, सतीश पवार, स्वप्नील चौधरी, लीलाधर खंडारे, भास्कर धोत्रमो अन्सार, अशोक सोनोने, गोकुळ चव्हाण, गणेश धुमपटवार, संदीप तवाडे, सुलतान पठाण , अब्दुल मजीद , महेंद्र मलिये , अविनाश पाचपोर , रवींद्र खंडारे, अमोल दिपके, वासिम्मोदिन, स्वप्नील खेळकर, खुशाल नेमाडे, आयकर विभागचे अनिल इचे लक्षमन सिरसाठ, सुनील दीपकवार विजय गुल्हाने, विनोद ठाकरे प्रशांत कमलाकर, अक्षय बोबडे, रामकिसन डोईफोडे यांनी केली .


Share

Leave a Comment

error: Content is protected !!