Join Whatsapp

अकोला गुन्हे शाखेने अवघ्या चार तासात गुन्हेगार केले गजाआड

Photo of author

By Sir

Share

प्रेमराज शर्मा अकोला – २३ ऑक्टो. २४ – अकोला गुन्हे शाख आपल्या कार्यासाठी खूप प्रसिद्ध आहे, अकोला शहरात भर दिवसा चोरट्यांनी दि. २१ऑक्ट २४ रोजी खेमका अपार्टमेंट रतनलाल प्लॉट योगेश बियाणी सकाळी ६.३० वा. जिम मध्ये जाण्या साठी आपल्या घरचे दार ओढून निघाले, घरात पत्नी व मुले झोपले असल्या मुळे त्यांनी कुलूप लावले नाही, या घोष्टीचा फायदा घेत चोरटे त्यांचा घरात शिरले व ३ मोबाईल व ४ नग सोन्याचा अंगठ्या असा एकूण १,५०,००० चा मुद्देमाल घेऊन पसार झाले. योगेश यांच्या पत्नी ८.३० वा. उठल्यावर त्यांना हे लक्षात आले.

मग त्यांनी रामदास पेठ पोलीस स्टेशन अकोला येथे धाव घेतली असून याबद्दल गुन्हा नोंदविला सदर गुन्ह्याची उकल व्हावी याकरिता माननीय पोलीस अधीक्षक साहेब अकोला यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेतील प्रमुख पोलीस निरीक्षक श्री शंकर शेळके यांना सुचित केले. शेळके यांनी एक पथक तातडीने नेमले तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे १. मुन्नीयप्पम कुप्पम २.शिवा मुन्नी आप्पण ३.चिन्हा नारायना ४.व्यंकटेश नारायण शिवा हे सगळे वेल्लोर तामिळनाडू इथले रहिवासी असून सध्या ही अट्टल चोरटी टोळी अकोल्यात सक्रिय असल्याचे समजले. सापडा रचुन अकोटफैल भोईपुरा अकोला येथून चोरट्यांना अटक केली व १००% मुद्देमाल जप्त केला.

सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक बच्चनसिंह साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे, पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनात विजय चव्हाण,गोपाल जाधव, माजीद पठाण, अ.माजीद वासिमोद्दिन शेख, रविंद्र खंडारे,महेंद्र मलिये,अविनाश पाचपोर,सुलतान पठाण, गोकुल चव्हाण,भीमराव दिपके,मो. अमीर, करण मानकर,अशोक सोनोने,अभिषेक पाठक, सतीश पवार,मनीष ठाकरे यांनी केली


Share

Leave a Comment

error: Content is protected !!