Join WhatsApp group

अकोला – खदान पोलिसांची तत्पर कारवाई : हरवलेला १५ वर्षीय मुलगा १२ तासांत शोधून सुरक्षित पालकांच्या ताब्यात

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला : २४ ऑक्टो.२५ : अकोला शहरातील खदान पोलीस ठाण्याच्या कार्यक्षम तपास पथकाने अप. क्र. ८५४/२०२५, कलम १३७(२) भारतीय न्याय संहितेतील प्रकरणात केवळ १२ तासांच्या आत हरवलेला १५ वर्षीय मुलगा शोधून त्याला सुरक्षितपणे त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले आहे.

फिर्यादी श्री. नरेंद्र महादेव आजलसांडे (वय ४३, रा. रामनगर, बार्शिटाकळी, जि. अकोला) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा मयुरेश नरेंद्र आजलसांडे (वय १५) हा दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता ट्युशनसाठी खडकी, अकोला येथे जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला. संध्याकाळपर्यंत तो घरी परत न आल्याने पालकांनी ट्युशन शिक्षक श्री. अजय सिरसाठ यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी मुलाला ट्युशन संपल्यानंतर कौलखेड येथून अॅटोमध्ये बसविल्याचे सांगितले. परंतु मुलगा घरी पोहोचला नाही.

कुटुंबियांनी अकोला बसस्थानक, रेल्वे स्टेशन, परिसर व नातेवाईकांकडे शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. परिणामी अज्ञात व्यक्तीने मुलाला पळवून नेल्याच्या संशयावरून खदान पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

तपासादरम्यान पोलीसांनी तात्काळ शोध मोहीम सुरू केली. शहरातील विविध ठिकाणी तपास सुरू असताना पिडीत मुलगा श्री. अनुप महापुरे यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ पोलीस व मुलाचे पालक यांना माहिती दिली. त्यानंतर पोलीसांनी मुलाला सुरक्षित ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन केले.

ही कारवाई मा. श्री. अर्चित चांडक (भा.पो.से.), पोलीस अधीक्षक अकोला, मा. श्री. चंद्रकांत रेहडी, अपर पोलीस अधीक्षक (शहर), मा. श्री. सुदर्शन पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर विभाग, अकोला)श्री. मनोज केदारे, पोलीस निरीक्षक, खदान पोलीस स्टेशन अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

तपास व शोधमोहीमेत ए.एस.आय. दिनकर धुरंधर, पो. हवा. संतोष गावंडे, अमरसिंग पवार, पो. शि. भुषण मोरे, अभिमन्यु सदांशिव, वैभव कस्तुरेस्वप्नील वानखडे यांनी मोलाची भूमिका बजावली.

खदान पोलिसांच्या तात्काळ व प्रभावी कारवाईबद्दल नागरिकांकडून प्रशंसा व्यक्त होत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!