Join WhatsApp group

अकोला जिल्हा रग्बी फुटबॉल निवड चाचणी संपन्न

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला : श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, निंबा (ता. अकोला) येथे दिनांक १८ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय रग्बी फुटबॉल निवड चाचणी पार पडली. या चाचणीमधून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी अकोला जिल्ह्याचा संघ जाहीर करण्यात आला आहे. ही स्पर्धा २२ ते २४ ऑगस्टदरम्यान बालेवाडी क्रीडा संकुल, पुणे येथे होणार आहे.

या प्रसंगी जिल्हा रग्बी फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रेमराज शर्मा, सचिव ज्ञानेश्वर ताले, सहसचिव अमित मनवर उपस्थित होते.

🌸 अध्यक्षांचे मार्गदर्शन :अध्यक्ष प्रेमराज शर्मा यांनी खेळाडूंना प्रोत्साहित करताना सांगितले की “खेळाडूंनी मेहनतीने सराव करून जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल करावे. खेळामुळे शिस्त, एकजूट व आत्मविश्वास वाढतो. सर्वांनी आपली क्षमता दाखवून उत्तम कामगिरी करावी.”

🌸 सचिवांचे मार्गदर्शन :सचिव ज्ञानेश्वर ताले यांनी भाषणात सांगितले की “जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना संधी मिळावी यासाठी संघटना नेहमीच प्रयत्नशील आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत खेळाडूंनी क्रीडाभाव जपून आपले प्रदर्शन करावे.”

या प्रसंगी सहसचिव अमित मनवर यांनीही खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

स्पर्धा पार पडण्यासाठी विश्वजीत ठाकूर यांनी विशेष प्रयत्न केले.

✨ निवड झालेले खेळाडू

मुलींचा संघ

  1. कु. पूर्वा सदानंद तायडे – संघनायक
  2. कु. रुषाली जगदीश कराळे
  3. कु. तनु महेंद्र वानखडे
  4. कु. रिता जीवन तायडे
  5. कु. राजनंदिनी लक्ष्मण सोळंके
  6. कु. कोमल अविनाश मोरे
  7. कु. स्नेहल संतोष वाकळे
  8. कु. श्रुती महेंद्र दामोदर
  9. कु. स्नेहल संजय वानखडे
  10. कु. आरती महादेव मास्कर
  11. कु. खुशी राहुल तायडे
  12. कु. तन्वी विजय पहुरकर

मुलांचा संघ

  1. समर्थ विठ्ठल खारोडे – संघनायक
  2. कृष्णा पांडुरंग वाकळे
  3. रोहित सतीश देशमुख
  4. धीरज देविदास उमरावते
  5. गजानन सहदेव मास्कर
  6. अनुराग सदानंद गवई
  7. सागर नागसेन अवचार
  8. रोहित प्रमोद तायडे
  9. आदित्य मुकुंद रहाटे
  10. प्रतीक गजानन कराळे
  11. अलोक हेमंत गर्जे
  12. प्रसिक कैलास वानखडे

👨‍🏫 प्रशिक्षक व व्यवस्थापक

कोच : श्री. रामपाल कसनदास खचकड (सहाय्यक शिक्षक)

मॅनेजर : श्री. सुनील नीलकंठराव उगले (शारीरिक शिक्षक) स्पर्धेत सहभागी होणार आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!