Join WhatsApp group

प्रामाणिक प्रयत्नातून यश संपादन करा : पालकमंत्री आकाश फुंडकर

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक १२: अकोला: शिक्षण केवळ गुणासाठी नसून ते ज्ञानवृद्धी आणि जीवनमूल्य घडविण्याचे साधन आहे. स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक प्रयत्नांतून यश संपादन करा. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन प्रशासन आपल्यासोबत आहे.

अशा शब्दात राज्याचे कामगार मत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुडकर यांनी दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.दहावी व बारावीच्या परीक्षा निकोप वातावरणात सुरळीत पार पाडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनानुसार कॉपीमुक्त व भयमुक्त परीक्षा अभियानात जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यार्थ्यांनीस्वयंस्फूर्तीन सहभागी व्हावे,

अस आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.आगामी परीक्षा काळात जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रे कॉपीमुक्त व भयमुक्त राहतील यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे नियोजनपूर्वक विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

त्याच धर्तीवर पारदर्शक परीक्षा प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन करून पालकमंत्र्यांनी सर्व विद्याथ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!