Join Whatsapp

सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ४२० तक्रारी प्राप्त, यापैकी ४१४ निकाली; १०६४ लक्ष रुपयांची मालमत्ता जप्त

Photo of author

By Sir

Share

न्यूज डेस्क – मुंबई, दि.१९ : राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ साठी दि.१५ ऑक्टोबर २०२४ रोजी आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते १८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण ४२० तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ४१४ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. यापैकी १०० मिनिटांत २५६ तक्रारींचा निपटारा करण्यात आल्या आहे. राज्यात ठाणे जिल्ह्यातील सर्वात जास्त तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.विधानसभा निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण १०६४ लक्ष रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!