Join WhatsApp group

Ads

-

बोरगाव मंजू येथील मारहाण प्रकरणी आरोपी दोषी; २ वर्षांहून अधिक कारावास

By Sarkar Maza

February 17, 2026 8:03 pm

Ads

अकोला (दि. १७ फेब्रुवारी २०२६) : पोलीस स्टेशन बोरगाव मंजू येथे दाखल अपक क्रमांक ६८/२०२० मधील मारहाण व खुनाचा प्रयत्न प्रकरणी विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधीश, क. क्र. १ अकोला यांनी आरोपी संजय हरिभाऊ बागडे (वय ३४, रा. भीमनगर, बोरगाव, जि. अकोला) याला दोषी ठरवत २ वर्षे ८ महिने १४ दिवसांचा कारावास व ५०० रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास ७ दिवसांचा साधा कारावास भोगावा लागणार आहे.

या प्रकरणातील फिर्यादी पुरुषोत्तम जानुजी आठवले यांनी २ मार्च २०२० रोजी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, ते दुपारी सुमारे ४.३० वाजता हॉटेलमध्ये कांदा कापत बसले असताना आरोपी संजय बागडे हा तेथे आला व उधारीची मागणी करू लागला. फिर्यादीने आपण हॉटेलचा मालक नसल्याचे सांगितल्यावर आरोपीने शिवीगाळ केली. शिवीगाळ करू नको असे सांगितल्यावर आरोपीने कांदा कापण्याचा चाकू हातात घेऊन फिर्यादीच्या तोंडावर व गळ्यावर वार करून जखमी केले. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले होते.

या जबाबावरून बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात कलम ३०७, ३२४, ५०४ भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष अधाव यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

सुनावणीदरम्यान साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. त्याआधारे न्यायालयाने आरोपीला भादंवि कलम ३२४ अंतर्गत दोषी ठरवत शिक्षा सुनावली.

या खटल्यात सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता श्री. अफोटकर यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून एएसआय फझलुर रहेमान (सीएमएस सेल) व पोहेकॉ रूपेश इंगळे यांनी प्रभावी पाठपुरावा केला.

या प्रकरणात पोलिस अधिक्षक अकोला श्री. अचिंत चांडक, अपर पोलिस अधिक्षक श्री. चंद्रकांत रेड्डी तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती वैशाली मुळे यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!