Join WhatsApp group

बेकायदेशीरपणे देशी दारू बाळगल्या प्रकरणी आरोपीला अटक

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला : जिल्ह्यात बेकायदेशीर दारूविक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एका तरुणाला देशी दारूसह अटक केली आहे.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुरुद्वाराजवळ सापळा रचला. त्या वेळी एमएच ३० बीजी ०२१५ क्रमांकाच्या दुचाकीवरून एक तरुण दारूचे बॉक्स घेऊन जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तात्काळ दुचाकी थांबवून झडती घेतली असता, त्याच्याकडे १५,३६० रुपये किमतीच्या १९२ देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या.

या कारवाईत एकूण ८५,३६० रुपये किमतीचा माल – म्हणजे दारू व दुचाकी पोलिसांनी जप्त केला आहे. अकोट फैल येथील माची मार्केट परिसरातील रहिवासी नरेश श्रीकृष्ण तेलगोटे याला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी प्रमुख शंकर शेळके यांच्या नेतृत्वात पीएसआय पठाण, उमेश परये, शेख हसन, श्रीकांत पातोंड, अभिषेक पाठक यांच्या पथकाने केली.

जिल्ह्यात अवैध दारू व्यवसायांविरोधातील अशा सततच्या कारवायांमुळे गुन्हेगारी करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!