Join WhatsApp group

अकोला गांधीग्राम कावड यात्रेत दुर्घटना; १५ जण जखमी

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला : कावड यात्रेदरम्यान दगडी पुल अकोला दुर्दैवी दुर्घटना घडली. डाबकी रोड-वाशी परिसरात कावड घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला अपघात झाल्याने तब्बल १५ जण जखमी झाले आहेत.

कावडधारकांना त्यांना अकोल्यातील विविध दवाखान्यांत दाखल करून उपचार सुरू आहेत. काही जखमींना ओझोन हॉस्पिटल व मेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच खासदार अनुप धोत्रे आमदार रणधीर सावरकर यांनी तत्परतेने रुग्णालयांना भेट दिली. जखमी शिवभक्तांना सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, औषधोपचारात कोणतीही कमतरता राहू नये अशा स्पष्ट सूचना त्यांनी जीएमसीचे अधिष्ठाता डॉ. गजभिये यांना दिल्या.

या दुर्घटनेबाबत आमदार सावरकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सर्व जखमींचा उपचार करण्याची घोषणा केली. ‘‘जखमी भाविकांना दीर्घायुष्य लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना’’ असे आमदारांनी सांगितले.

या घटनेची माहिती आमदार सावरकर यांनी खासदार अनुप धोत्रे यांना दिली असून सर्व लोकप्रतिनिधींनी या दुर्दैवी प्रसंगी जखमी भाविकांसोबत असल्याचे सांगितले आहे.

अशी माहिती भारतीय जनता पार्टी चे प्रवक्ता गिरीश जोशी यांनी दिली आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!