प्रेमराज शर्मा – २० ऑक्टो २४ – मुर्तीजापुर – मुर्तीजापुर बार्शीटाकळी मतदार संघ हा पैराशूट उमेदवारान साठी इतका फेमस आहे कि इथे कोण कदी कोणत्या पक्षाचा तिकीट घेऊन येईल व निवडणूक लढेल याचा अंदाज नाही.
ज्याचा कुठंच जमत नाही त्याचा इथे खेळ जमतो काही उमेदवार तर इथे अप डाऊन करतात, असेच एक विशिष्ठ पक्षाचा मला तिकीट घोषित झाला असून अर्धा मतदार संघ पट्ठ्याने पिंजून पण काढला पण मात्र अधिकृत घोषणा झाली नाही, तसेच काही पत्रकार मंडळीना त्याने आपल्या पक्षाचा नवावर मुलाखती सुद्धा दिल्या.
वेळेवर एन्ट्री घेतल्याने भाऊचे नियोजन शुन्य पण कमी वेळेत आपला नाव कसा जनते पर्यंत पोहोचेल याची भाऊला गडबड, या गडबडीत भाऊ ने आपला प्रचार एक विशिष्ट पद्दतीने सुरु केला आहे.
जसे काही मार्केटिंग वाले चौकात बाजारात उभे राहून स्पीकर लावून एखाद्या कंपनीचा तेल विकतात व जाहिरात करतात तसे यांचा प्राचाराला सुरुवात झाली आहे. भाऊ पहिल्यांदा निवडणुकीत उभे असून त्यांना आचार संहितेचे कानून कायदे माहित नाही असे वाटते.
असो पण निवडणूक आयोग पण या कडे कसे दुर्लक्ष करत आहे हे नाही समजत आहे? असो सोसेल तेवढ बोलायचं……..
