Join WhatsApp group

उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णाने केली आत्महत्या

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला शहरातील गजानन हॉस्पिटलमध्ये आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

मृताचे नाव अमोल कावनपुरे (वय ३२, रा. पहाडीपुरा, बनोसा, ता. दर्यापूर, जि. अमरावती) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमोल हे २८ ऑक्टोबर रोजी पायाच्या उपचारासाठी गजानन हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते.

आज सकाळी हॉस्पिटलमधील नर्स रूटीन तपासणीसाठी गेली असता रुग्णाची रूम आतून बंद असल्याचे तिला लक्षात आले.
कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडला असता, अमोल यांनी दुपट्ट्याने पंख्याला गळफास घेतल्याचे आढळले.
डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
मात्र प्राथमिक माहितीनुसार, अमोल यांनी आजाराला कंटाळून आत्महत्या केली असावी, अशी चर्चा शहरात सुरू आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!