Join WhatsApp group

एका वकिलाच्या बातमीवरून शहरात खळबळ; एका पोर्टलवर बातमी लागून लगेचच डिलीट

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर (दि. १७ जुलै २५) : शहरात एका नामवंत वकिला संदर्भात काल रात्री अचानक एका न्यूज पोर्टलवर एक बातमी प्रसिद्ध झाली होती. ही बातमी काही वेळातच चर्चेचा विषय ठरली आणि प्रशासकीय यंत्रणेमध्येही खळबळ उडाली.

बातमी प्रसारित होताच काही वकील आणि काही निवडक पत्रकारांनी थेट त्या पोर्टलच्या प्रतिनिधींशी संपर्क साधत प्रश्न विचारले, मात्र त्या पोर्टलच्या प्रतिनिधीला याबाबत काहीच कल्पना नव्हती, मात्र त्यांना पोर्टलवरील बातमी बाबत कोणतीही ठोस माहिती नव्हती, बातमी वरतून लागल्याचे काही क्षणात समजले.

ही बातमी लागल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात संबंधित पोर्टलच्या संपादकावर काही वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि निवडक पत्रकार मंडळींनी दबाव टाकत ती बातमी काढून टाकण्यास भाग पाडले व कायदेशीर परिणामांची आठवण करून देत ती बातमी डिलीट करण्यासाठी त्या पोर्टलच्या संपादकाला भाग पाडले.

दरम्यान, आता मूर्तिजापूर शहरात ‘तो वकील कोण?’ यावरच मुख्य चर्चा सुरू असून, सोशल मीडियावर अनेक चर्चा-तर्कवितर्क रंगू लागले आहेत. त्या वकिलाचे प्रशासनाशी नेमके काय संबंध आहेत, त्याच्याविरोधात बातमी का आली आणि ती कशासाठी काढून टाकण्यात आली – हे प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाले आहेत.

“त्या वकिलाचा भांडाफोड कोण करणार?”

– हा प्रश्न सध्या शहरातील चहा टपऱ्यांपासून सोशल मीडियापर्यंत चर्चेचा विषय बनला आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!