दिनांक ११ :अकोला : सिव्हिल लाइन पोलिस स्टेशनहद्दीतील विवाहितेचे लग्न सोलापूर जिल्ह्यात झाले. सासरकडील मंडळीनी विवाहितेला जमीन व घर घेण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केला. याप्रकरणी शनिवार, ७फेब्रुवारी रोजी सिव्हिल लाइन पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सासरकडील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
रणपिसे नगरातील ३६ वर्षीय विवाहितेचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यानंतर काही दिवसानंतर विवाहितेकडे पैशाची मागणी करून शारीरिक व मानसिक त्रास दिला. विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हेमंत भागवत मांजरे (३७) रा. एलआयसी ऑफिस, जुनी नगर परिषद रोड आंबेडकर चौक वाशिम, भागवत महादेव मांजरे (६५), सुवर्ण भागवत मांजरे (६४), नीलेश भागवत मांजरे, प्रियंका विशाल काळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.