Join WhatsApp group

Ads

-

पोलिस स्टेशनचा अर्ध्या पासून जास्त सेवा सामान्य जनतेचा खिश्यात

By Sarkarmzanews

January 3, 2026 9:13 am

Ads

अकोला : दिनांक ०३ : मोबाईलमुळे आजचे जीवन अधिक सुलभ, जलद आणि गतिमान झाले आहे. हातातील छोट्या उपकरणातून संवाद, माहिती, बँकिंग, शिक्षण, आरोग्य सेवा ते सरकारी कामे काही सेकंदात पूर्ण होतात. पूर्वी तासन्‌तास लागणारी कामे आता एका क्लिकवर होत असल्याने वेळ, श्रम आणि खर्चाची मोठी बचत होते. मोबाईलने सामान्य माणसालाही तंत्रज्ञानाच्या मुख्य प्रवाहात आणत दैनंदिन जीवन अधिक सोपे आणि प्रभावी बनवले आहे.

तसेच नागरिक व पोलीस दलातील संवाद अधिक सुलभ, जलद व पारदर्शक करण्याच्या दृष्टीने अकोला जिल्हा पोलीस दलाने आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत ‘Akola CopConnect II’ व्हॉट्सअप चॅटबॉटची सुविधा सुरू केली आहे.

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन २०२६ चे औचित्य साधून आज २ जानेवारी २०२६ रोजी या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ मा. वर्षा मीना, जिल्हाधिकारी अकोला यांच्या शुभहस्ते करण्यात आला.या वेळी मा. अर्चित चांडक (IPS), पोलीस अधीक्षक, अकोला, मा. सुनील लहाने, आयुक्त, अकोला महानगरपालिका, मा. सुमन सोळंके, DFO अकोला, मा. चंद्रकांत रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक, मा. ईशानी आनंद, सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘१५० दिवसांच्या कृती आराखड्या’ला तंत्रज्ञानाची जोड

मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १५० दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत ‘स्मार्ट पोलिसिंग’ या संकल्पनेला गती देण्यासाठी अकोला पोलीस दलाने AI आधारित व्हॉट्सअॅप चॅटबॉट नागरिकांच्या सेवेत आणला आहे. प्रशासनात तंत्रज्ञानाचा लोकाभिमुख व सकारात्मक वापर कसा करता येतो, याचे हे उत्तम उदाहरण ठरत आहे.

एकाच क्रमांकावर सर्व पोलीस सेवानागरिकांसाठी 9403553117 हा अधिकृत व्हॉट्सअप क्रमांक सुरू करण्यात आला असून, या एकाच क्रमांकावरून पोलीस दलाशी संबंधित विविध सेवा व माहिती घरबसल्या, एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

चॅटबॉटची प्रमुख वैशिष्ट्ये

पोलीस ठाण्यांची सविस्तर माहिती : जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे संपर्क क्रमांक,

प्रभारी अधिकाऱ्यांची नावे,

मोबाईल क्रमांक,

ई-मेल,

सोशल मीडिया अकाउंट्स व गुगल लोकेशन

ऑनलाईन तक्रार सुविधा :

व्हॉट्सअपवरून तक्रार नोंदणी व तक्रारीची सद्यस्थिती तपासण्याची सुविधा

१७ प्रकारच्या सेवा : ई-चालान भरणे, पासपोर्ट पडताळणी, चारित्र्य पडताळणी, कार्यक्रम परवानगी व इतर आवश्यक पोलीस सेवांची माहिती

द्विभाषिक सुविधा : मराठी व इंग्रजी

२४×७ उपलब्धता : चोवीस तास सेवा सामान्य नागरिकांना होणारे थेट फायदे

‘Akola CopConnect II’ चॅटबॉटमुळे सामान्य नागरिकांना पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष जाण्याची गरज न पडता तक्रार नोंदणी, तक्रारीची सद्यस्थिती तपासणे, विविध प्रमाणपत्रांबाबत माहिती व ई-चालान भरणे यांसारख्या सेवा सहज मिळणार आहेत.

यामुळे वेळ, पैसा व अनावश्यक धावपळ वाचणार असून नागरिकांचा त्रास लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.

जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे संपर्क क्रमांक व गुगल लोकेशन सहज उपलब्ध झाल्याने आपत्कालीन परिस्थितीत त्वरित पोलीस मदत मिळणे अधिक सुलभ होणार आहे.

मध्यस्थ, एजंट किंवा दलालांवर अवलंबून राहण्याची गरज संपुष्टात येत पोलीस प्रशासनातील पारदर्शकता व विश्वास वाढणार आहे.

मराठी व इंग्रजी द्विभाषिक आणि २४ तास उपलब्ध असलेली ही सेवा ग्रामीण व शहरी भागातील नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक व तरुण वर्गासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचे नेतृत्व ठळक

अकोला जिल्हा पोलीस दलाला तंत्रज्ञान-सक्षम, लोकाभिमुख व पारदर्शक बनवण्यात पोलीस अधीक्षक अर्चित चांडक (IPS) यांची भूमिका अत्यंत मोलाची ठरत आहे.

प्रशासकीय कामकाजाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत त्यांनी अकोला पोलीस दलाला ‘स्मार्ट पोलिसिंग’चा आदर्श नमुना बनवला आहे.

नागरिकांच्या गरजा ओळखून त्यानुसार नवकल्पना राबवणारे अधिकारी आजच्या प्रशासनाची खरी गरज असून अर्चित चांडक यांचे कार्य त्याचे उत्तम उदाहरण आहे.

निर्मितीमध्ये तरुणांचे मोलाचे योगदान

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल जुमळे, API मनिषा तायडे (सायबर पोलीस ठाणे), चि. भूषण अरुण रंभापुरे तसेच शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, अकोला येथील कॉम्प्युटर सायन्स विभागाचे विद्यार्थी गौरव पवार, महेश डोंगरे, गौरी चेटुले, भावेश खोसे, जव्वाद बैग यांनी अथक परिश्रम घेऊन या चॅटबॉटची निर्मिती केली.

उद्घाटन सोहळ्यास सर्व विभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

अकोला पोलीस दलाकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, ‘Akola CopConnect II’ व्हॉट्सअप चॅटबॉटचा अधिकाधिक वापर करून पोलीस सेवांचा लाभ घ्यावा.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!