Join WhatsApp group

Ads

अकोला महानगरपालिका निवडणूक : भाजप–राष्ट्रवादी युती, 62 जागांवर भाजपचे उमेदवार : सरकार माझा वर पहा यादी

By Sarkarmzanews

December 30, 2025 7:29 pm

Ads

अकोला : दिनांक ३० : अकोला महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती झाली असून, या युतीअंतर्गत भाजप 62 जागांवर उमेदवार उभे करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 14 जागा देण्यात आल्या असून, उर्वरित 4 जागा भाजपच्या मित्र पक्षांसाठी सोडण्यात आल्याची माहिती भाजपचे अकोला महानगर निवडणूक प्रमुख विजय अग्रवाल यांनी दिली.
भाजपने यंदा उमेदवारी देताना ‘गुजरात पॅटर्न’चा अवलंब करत 60 टक्के नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. पक्षाने अंतर्गत सर्वेक्षणाच्या आधारे नव्या व जुन्या कार्यकर्त्यांना तिकीट दिले असून, 2017 मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी सुमारे 40 टक्के जागांवर नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे.


सामाजिक समतोल राखत भाजपने उमेदवारांची निवड केली असून, यात 28 महिला व 34 पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये 11 अनुसूचित जाती, 1 अनुसूचित जमाती, 18 ओबीसी तसेच 32 सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. ज्यांना यावेळी उमेदवारी मिळाली नाही, त्यांचा संघटना विस्तारासाठी उपयोग करून त्यांना योग्य तो सन्मान देण्यात येईल, असेही विजय अग्रवाल यांनी स्पष्ट केले.


मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, निवडणूक प्रभारी ना. चंद्रशेखर बावनकुळे, संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार वसंत खंडेलवाल, महानगर अध्यक्ष जयंत मसने व निवडणूक प्रमुख विजय अग्रवाल यांच्या मान्यतेनंतर भाजप प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी यांनी उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली.


भाजप उमेदवारांची यादी (प्रमुख प्रभाग)
प्रभाग 1 ते 5
प्रभाग 1 (ब) – सर्वसाधारण महिला : दिपाली राम बोंद्रे
प्रभाग 2 (ब) – ना.मा.प्र. : शरद श्रीराम तुरकर
प्रभाग 2 (क) – सर्वसाधारण महिला : अनिता राजेश चौधरी
प्रभाग 2 (ड) – सर्वसाधारण : नितीन नरेश राऊत
प्रभाग 3 (अ) – अनु. जाती महिला : शशिकला सतीश काळे
प्रभाग 3 (ब) – ना.मा.प्र. महिला : नितू महादेव जगताप
प्रभाग 3 (क) – सर्वसाधारण : सागर प्रकाशराव शेगोकार
प्रभाग 3 (ड) – सर्वसाधारण : प्रशांत गोविंदराव जोशी
प्रभाग 4 (अ) – अनु. जाती : संदीप रामकृष्ण शेगोकार
प्रभाग 4 (ब) – ना.मा.प्र. महिला : शिल्पा किशोर वरोकार
प्रभाग 4 (क) – सर्वसाधारण महिला : पल्लवी शिवाजी मोरे
प्रभाग 4 (ड) – सर्वसाधारण : मिलिंद डिगांबर राऊत
प्रभाग 5 (अ) – अनु. जाती महिला : विद्या सुभाष खंडारे
प्रभाग 5 (ब) – ना.मा.प्र. : जयंत रामराव मसने
प्रभाग 5 (क) – सर्वसाधारण महिला : रश्मी प्रशांत अवचार
प्रभाग 5 (ड) – सर्वसाधारण : विजय कमलकिशोर अग्रवाल
प्रभाग 6 ते 10
प्रभाग 6 (अ) – अनु. जाती महिला : आरती प्रकाश घोगलिया
प्रभाग 6 (ब) – ना.मा.प्र. : हर्षद प्रमोद भांबरे
प्रभाग 6 (क) – सर्वसाधारण महिला : निखिता राहुल देशमुख
प्रभाग 6 (ड) – सर्वसाधारण : पवन मुगुटराव महल्ले
प्रभाग 8 (अ) – ना.मा.प्र. महिला : रंजना शाम विंचनकर
प्रभाग 8 (ब) – ना.मा.प्र. : तुषार महेंद्र भिरड
प्रभाग 8 (क) – सर्वसाधारण महिला : माधुरी सुनील क्षीरसागर
प्रभाग 8 (ड) – सर्वसाधारण : राजेश्वर केशव घोटे
प्रभाग 9 (ब) – ना.मा.प्र. महिला : ज्योती वसंत मानकर
प्रभाग 9 (ड) – सर्वसाधारण : हर्षल बाबुराव चौधरी
प्रभाग 10 (अ) – ना.मा.प्र. महिला : मंजुषा संजय शेळके
प्रभाग 10 (ब) – सर्वसाधारण महिला : वैशाली विलास शेळके
प्रभाग 10 (क) – सर्वसाधारण : अनिल देविदास गरड
प्रभाग 10 (ड) – सर्वसाधारण : नितीन मुरलीधर ताकवाले
प्रभाग 11 ते 20
प्रभाग 11 (ड) – सर्वसाधारण : राहुल राजकुमार चौरसिया
प्रभाग 12 (अ) – अनु. जाती : संतोष देवराव डोंगरे
प्रभाग 12 (ब) – ना.मा.प्र. महिला : कल्पना संजय गोटफोडे
प्रभाग 12 (ड) – सर्वसाधारण : अजय रमेशचंद्र शर्मा
प्रभाग 13 (अ) – अनु. जाती : विशाल श्रावण इंगळे
प्रभाग 13 (ब) – ना.मा.प्र. महिला : प्राची निलेश काकड
प्रभाग 13 (क) – सर्वसाधारण महिला : सुनिता विजय अग्रवाल
प्रभाग 13 (ड) – सर्वसाधारण : अनिल सुनील मुरूमकार
प्रभाग 14 (अ) – अनु. जाती महिला : दिपाली प्रवीण जगताप
प्रभाग 14 (ब) – ना.मा.प्र. महिला : अस्मिता प्रकाश वगारे
प्रभाग 14 (क) – सर्वसाधारण : गोपाल रघुनाथ मुळे
प्रभाग 14 (ड) – सर्वसाधारण : दिलीप तुळशीराम भरणे
प्रभाग 15 (अ) – ना.मा.प्र. : हरीश रतनलाल अलीमचंदानी
प्रभाग 15 (ब) – सर्वसाधारण महिला : मनीषा रविंद्र भंसाली
प्रभाग 15 (क) – सर्वसाधारण महिला : शारदा रणजीत खेडकर
प्रभाग 15 (ड) – सर्वसाधारण : अरविंद प्रल्हाद टाले
प्रभाग 16 (अ) – अनु. जाती : सिद्धार्थ रामदास उपर्वट
प्रभाग 16 (ब) – ना.मा.प्र. महिला : मुस्कान आशिष पंजवानी
प्रभाग 16 (ड) – सर्वसाधारण : संजय बाबूलाल बडोने
प्रभाग 17 (ब) – ना.मा.प्र. : अमोल अवधूत मोहोकार
प्रभाग 17 (ड) – सर्वसाधारण : करण अशोक साहू
प्रभाग 18 (अ) – अनु. जाती महिला : सरिता सुनील कांबळे
प्रभाग 18 (ब) – ना.मा.प्र. : अमोल सुधाकर गोगे
प्रभाग 18 (ड) – सर्वसाधारण : दिलीप रामकृपाल मिश्रा
प्रभाग 19 (अ) – अनु. जाती : धनंजय गणपत धबाले
प्रभाग 19 (ब) – अनु. जमाती : गजानन शाळीग्राम सोनोने
प्रभाग 19 (क) – ना.मा.प्र. : योगिता गणेश पावसाळे
प्रभाग 19 (ड) – सर्वसाधारण : माधुरी संजय बडोने
प्रभाग 20 (अ) – अनु. जाती : मंगेश भगवान झिने
प्रभाग 20 (ब) – ना.मा.प्र. महिला : शारदा वैकुंठ ढोरे
प्रभाग 20 (क) – सर्वसाधारण महिला : सोनाली गणेश अंधारे
प्रभाग 20 (ड) – सर्वसाधारण : विनोद मुरलीधर मापारी
भाजप–राष्ट्रवादी युतीमुळे अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे अधिकच रंगतदार झाली असून, सर्वच पक्षांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!