Join WhatsApp group

Ads

अकोला महानगरपालिका निवडणूक : प्रभाग क्रमांक ३ मधून नीतू महादेव उर्फ बबलू भाऊ जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

By Sarkarmzanews

December 29, 2025 9:27 pm

Ads

अकोला : दिनांक २९ : अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापत चालले असून विविध प्रभागांमध्ये उमेदवारांची गर्दी वाढताना दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३ मधून नीतू महादेव उर्फ बबलू भाऊ जगताप यांनी अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत समर्थक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्ज दाखल झाल्यानंतर प्रभागात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रभाग क्रमांक ३ मध्ये रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा, स्ट्रीट लाईट, ड्रेनेज व्यवस्था आदी मूलभूत नागरी प्रश्न प्रलंबित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे काम करणार असल्याचा विश्वास नीतू महादेव उर्फ बबलू भाऊ जगताप यांनी व्यक्त केला.

अकोला महानगरपालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे उमेदवारांच्या हालचालींना वेग येत असून प्रभाग क्रमांक ३ मधील राजकीय समीकरणेही बदलताना दिसत आहेत.

नीतू महादेव उर्फ बबलू भाऊ जगताप यांच्या उमेदवारीमुळे येथील लढत अधिक चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे.आगामी काळात प्रचाराचा जोर वाढणार असून मतदार कोणाला संधी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!