Join WhatsApp group

Ads

हरीश अलीम चंदानी यांची घरवापसी तर तिसऱ्या आघाडीला धक्का

By Sarkarmzanews

December 29, 2025 9:20 pm

Ads

अकोला : दिनांक २९ : अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून अनेक दिग्गज नेत्यांच्या परतफेरीमुळे समीकरणे बदलताना दिसत आहेत.

अशातच विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या विरोधात जाऊन अपक्ष उमेदवार म्हणून लढणारे हरीश भाई अलीमचंदानी यांची भाजपमध्ये अखेर घरवापसी झाली आहे.

विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपला थेट आव्हान देत हरीश अलीमचंदानी यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला होता.

त्या निर्णयामुळे भाजपला पराभवाचा सामना करावा लागल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. त्यामुळे त्यांची भाजपबाहेरील वाटचाल ‘गद्दारी’ म्हणूनही पाहिली गेली होती.

दरम्यान, महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर नागपूर येथे झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत हरीश अलीमचंदानी यांना पुन्हा पक्षात घेण्याचे निर्देश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मात्र स्थानिक पातळीवर पक्षप्रवेशाबाबत संभ्रम आणि राजकीय अस्तित्वाची लढाई कालपर्यंत सुरूच होती.

अखेर वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानंतर आज हरीश अलीमचंदानी यांचा अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश झाला. विशेष म्हणजे, तिसऱ्या आघाडीचे प्रमुख सूत्रधार म्हणून पुढे आलेले हरीश अलीमचंदानी भाजपमध्ये परतल्याने तिसऱ्या आघाडीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

त्यांच्या प्रवेशामुळे तिसऱ्या आघाडीची गोची वाढली असून भाजपला मात्र मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.या पक्षप्रवेशामुळे अकोला महानगरपालिका निवडणुकीत भाजप अधिक मजबूत स्थितीत जाण्याची शक्यता असून, राजकीय हालचालींना नव्याने वेग आला आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!