Join WhatsApp group

Ads

महायुतीत ताणतणाव! १०–१५ जागांच्या प्रस्तावावर अमोल मिटकरी संतप्त, भाजप–शिवसेनेला ‘मैत्रीपूर्ण लढती’चा इशारा

By Sarkarmzanews

December 27, 2025 3:05 pm

Ads

अकोला : दिनांक २७ : ✒️ नरेंद्र शर्मा महाराष्ट्रातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत (भाजप, शिवसेना–शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस–अजित पवार गट) जागावाटपावरून मतभेद उफाळून आले आहेत. अकोला महानगरपालिकेतील संभाव्य जागावाटपामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र अस्वस्थता असून आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर थेट निशाणा साधला आहे.

अकोला महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या १० ते १५ जागा देण्याची चर्चा सुरू असून, यावरून अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियासह माध्यमांतून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

“मान-सन्मान नको, पण अपमान सहन करणार नाही”आमदार अमोल मिटकरी म्हणाले,

“आम्हाला तुमचा मान-सन्मान नको, पण अपमान कसा सहन करायचा? राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त १०–१५ जागांमध्ये गुंडाळून हलक्यात घेतले जात असेल, तर अकोल्यात आम्हाला आमची ताकद दाखवावी लागेल.”ते पुढे म्हणाले की, जिल्हा पातळीवरील निर्णय काहीही असोत, पण तळागाळातील कार्यकर्ता आजही स्वाभिमानाने काम करतो. योग्य सन्मानजनक जागा न मिळाल्यास अकोल्यात ‘मैत्रीपूर्ण लढत’ देण्याचा इशाराही त्यांनी दिला.

वादाची मुळं काय महायुतीच्या

सूत्रानुसार विदर्भातील चारही महानगरपालिकांमध्ये तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार आहेत. मात्र अकोल्यात २०१७ च्या निकालांमुळे जागावाटपाचा तिढा निर्माण झाला आहे.

२०१७ अकोला महानगरपालिका निकाल :

एकूण जागा : ८०

भाजप : ४८ (पूर्ण बहुमतशिवसेना (अविभाजित)

: ०८राष्ट्रवादी काँग्रेस (अविभाजित) : ०५

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप आपल्या जिंकलेल्या ४८ जागा सोडण्यास तयार नसून उर्वरित ३२ जागांपैकी शिंदे गटाला सुमारे १५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ १०–१२ जागा देण्याचा प्रस्ताव आहे. हाच प्रस्ताव राष्ट्रवादीकडून अपमानास्पद असल्याचे मानले जात आहे.

प्रभाग क्रमांक १७ वरून भाजप–शिंदे गटात जागावाटपातआणखी गुंतागुंत प्रभाग क्रमांक १७ मुळे वाढली आहे.

शिंदे गटातील राजेश मिश्रा (माजी ठाकरे गट) या प्रभागावर दावा सांगत आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून लढत भाजपच्या उमेदवाराचे सुमारे २,५०० मते कमी केली होती.

त्यामुळे या प्रभागात राजेश मिश्रा यांच्याशी कोणताही तडजोडीचा विचार करण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे बोलले जात आहे.

२०१७ मध्ये इतर पक्षांची स्थिती

काँग्रेस: १३

भारिप बहुजन महासंघ : ०३

अन्य : ०३

महायुतीतील हा वाढता तणाव निवडणुकीपूर्वीच ‘मैत्रीपूर्ण लढती’कडे नेणार का, याकडे अकोल्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!