Join WhatsApp group

Ads

--

नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षांना सदस्यत्व व मतदानाचा अधिकार

By Sarkarmzanews

December 24, 2025 9:14 pm

Ads

मुंबई : दिनांक २४ : नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील थेट निवडून आलेल्या अध्यक्षांना सदस्यत्व आणि मतदानाचा अधिकार देण्यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यासाठी अध्यादेश काढण्यास मान्यता देण्यात आली असून बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

सध्याच्या तरतुदीनुसार नगरपरिषद किंवा नगरपंचायतीचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असलेली व्यक्ती अध्यक्षपदासाठीही पात्र असते. त्यामुळे एखादी व्यक्ती एकाच वेळी अध्यक्ष आणि सदस्य म्हणून निवडून येऊ शकते. अशा व्यक्तीस दोन्ही पदांसाठी जनादेश मिळालेला असतो.

या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या सुधारणेनुसार, थेट निवडून आलेल्या अध्यक्षाला सदस्यत्व व सदस्य म्हणून एक मत देण्याचा अधिकार मिळणार आहे. अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून त्यांना एकच मत देता येईल. मात्र मतांची बरोबरी झाल्यास अध्यक्षाला निर्णायक मताचा अधिकार राहणार आहे.

या सुधारणा लागू करण्यासाठी अध्यादेश काढण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!