Join WhatsApp group

Ads

----

गुटखा आणि प्रतिबंधित पदार्थांची विक्री झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

By Sarkarmzanews

December 24, 2025 6:50 pm

Ads

गुटखा, तत्सम प्रतिबंधित पदार्थ सापडल्यास क्षेत्रातील अधिकाऱ्याचे होणार निलंबन

मुंबई, दि. २३ : राज्यात बंदी असलेल्या गुटखा व तत्सम प्रतिबंधित अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभाग सज्ज झाला आहे. यापुढे बंदी घालण्यात आलेले पदार्थ एखाद्या क्षेत्रात आढळल्यास त्या संबंधित क्षेत्रातील अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे.

एखाद्या अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री, साठा अथवा वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास त्या कार्यक्षेत्रातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल व त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करणारे परिपत्रकही मंत्री झिरवाळ यांच्या निर्देशानंतर जारी करण्यात आले आहे.

या अनुषंगाने अन्न सुरक्षा आयुक्त श्रीधर दुबे पाटील यांनी राज्यातील सर्व विभागीय सह आयुक्त (अन्न) यांना परिपत्रकाद्वारे आदेश दिले आहेत. त्यामध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थांची छुप्या पद्धतीने व अवैध मार्गाने विक्री, साठा व वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांवर प्रभावी व तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सह आयुक्त (अन्न), सहाय्यक आयुक्त (अन्न) तसेच अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व अन्न आस्थापनांची नियमित तपासणी करावी. कोणत्याही परिस्थितीत प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री, साठा किंवा वितरण होणार नाही, याची दक्षता घ्यावी व बंदी आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट आदेश मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले आहेत.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!