Join WhatsApp group

Ads

उमरखेड नगरपालिका सर्वत्र निवडणूक 2025 :महाविकास आघाडीचा दणदणीत विजय – साहेबराव कांबळे ठरले विजयाचे शिल्पकार

By Sarkarmzanews

December 22, 2025 6:22 pm

Ads

उमरखेड : दिनांक २२ : डॉ. विनोद पुंडगे

उमरखेड नगरपालिकेच्या 2025 च्या सर्वत्र निवडणुकीत महाविकास आघाडीने मतदारांचा ठाम विश्वास संपादन करत घवघवीत आणि ऐतिहासिक यश मिळवले आहे. नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्या एकूण 26 जागांपैकी तब्बल 18 जागांवर महाविकास आघाडी (काँग्रेस) विजयी झाल्याने शहराच्या राजकारणात मोठा परिवर्तनकारी टप्पा गाठला गेला आहे.


या दणदणीत विजयामागे साहेबराव कांबळे यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, अचूक रणनीती आणि संघटन कौशल्य निर्णायक ठरले. “अदृश्य शक्ती” म्हणून ओळखले जाणारे साहेबराव कांबळे यांनी पडद्यामागून निवडणुकीची संपूर्ण सूत्रे हाताळत काँग्रेसच्या 18 उमेदवारांना विजयाच्या शिखरावर नेले. शहरातील प्रत्येक प्रभागात संघटन मजबूत करणे, कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आणि विकासाचा स्पष्ट अजेंडा मतदारांपर्यंत पोहोचवणे, हे त्यांच्या नेतृत्वाचे ठळक वैशिष्ट्य ठरले.


जनतेने दिलेला हा कौल म्हणजे विकासाभिमुख, पारदर्शक आणि लोककल्याणकारी कारभारावर व्यक्त केलेला ठाम विश्वास आहे. प्रचारादरम्यान मांडलेली विकासाची स्पष्ट दृष्टी, नागरी सुविधांचा विस्तार, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य आणि शिक्षण यासारख्या मूलभूत प्रश्नांना दिलेले प्राधान्य मतदारांना भावले.


या ऐतिहासिक विजयाची दखल राष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली असून, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी दूरध्वनीद्वारे साहेबराव कांबळे यांचे अभिनंदन करत या घवघवीत यशासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या कौतुकामुळे उमरखेडच्या राजकारणात साहेबराव कांबळे यांचे नेतृत्व अधिक ठळकपणे समोर आले आहे.


या विजयामुळे उमरखेड नगरपालिकेत आता स्थिर, सक्षम आणि विकासाभिमुख नेतृत्वाखाली शहराला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. महाविकास आघाडीच्या या यशामुळे शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, पुढील काळात उमरखेडचा विकास वेगाने होईल, असा विश्वास जनतेत निर्माण झाला आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!