Join WhatsApp group

Ads

प्रभाग क्रमांक २ मध्ये वंचित आघाडीची आघाडी कायम

By Sarkarmzanews

December 21, 2025 12:20 pm

Ads

मुर्तिजापूर : दिनांक २१: मूर्तिजापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या मतमोजणीदरम्यान प्रभाग क्रमांक २ मधून दुसऱ्या फेरीअखेर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शेख इमरान शेख खलील यांनी ११४४ मतांची भक्कम आघाडी घेतली आहे.

शेख इमरान हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असून त्यांनी भाजपाचे उमेदवार हर्षल साबळे यांना पिछाडीवर टाकले आहे.दरम्यान, प्रभाग क्रमांक २ मधील नगरसेवक पदासाठी वंचित बहुजन आघाडीच्या सुनंदा सोळंके आणि तसवर खान तसवीर खान यांनी विजय मिळवला आहे.

या विजयामुळे प्रभाग क्रमांक २ मध्ये वंचित बहुजन आघाडीचे वर्चस्व स्पष्ट झाले असून राजकीय समीकरणांवर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मतमोजणीच्या पुढील फेऱ्यांकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून निकालांमुळे राजकीय वातावरण तापले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!