Join WhatsApp group

आचारसंहितेत ‘गुप्त’ बोरिंग!प्रशासनाला चकवा देत काही उमेदवारांचा गुप्त डाव?

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर : दिनांक २९ : मुर्तिजापूर शहरात निवडणूक रणधुमाळीने तापलेले वातावरण असताना स्टेशन परिसर आणि एकता नगर भागात अचानक झालेल्या बोरिंगमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

आचारसंहिता लागू असताना कोणत्याही विकासकामावर स्पष्ट बंदी असताना देखील जेव्हा रात्रीच्या अंधारात मशीन आली, खोदकाम झाले आणि सकाळी बोरिंग खोदलेले दिसले.

तेव्हा नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरू झाली.हे काम कोणी केले?आणि कोणत्या ‘फायदा–राजकारणा’साठी?

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार —“काही मजूर आले, मशीन चालली, पण कोणीही कोणाचा आदेश आहे हे सांगायला तयार नव्हते.”

यामुळे शहरात जोरदार चर्चा —काही उमेदवारांनी प्रशासनाला चकमा देत मतदारांना अमिष म्हणून बोरिंग खोदल्या का?

विकासाच्या नावाखाली मतदारांचे मन वळवण्याचा ‘अंडरग्राउंड’ प्रयत्न?की रात्रीची वेळ निवडून ‘कोणाचं नावच नको’ अशी रणनीती राबवली गेली?

स्टेशन व एकता नगरात एकच खदखद:कुणी परवानगी घेतली? परवानगी नसल्यास बोरिंग कोणाच्या मदतीने? मजूर व मशीन कुठून आणली?आणि सर्वात मोठा प्रश्न— ज्यांनी बोरिंग करून दिली त्यांचे नाव का लपवले जात आहे?

शहरात वातावरण तापले आणि सस्पेन्स वाढला!नागरिकांमध्ये आता एकच बोलाबोली —“आचारसंहितेत बोरिंग म्हणजे थेट मतांवर डोळा… पण चेहरा कुणाचा?”

सध्या तरी हे बोरिंग गुप्त राजकीय डाव, रात्रीची ऑपरेशन स्टाईल कामगिरी आणि लपवाछपवीचा खेळ म्हणून चर्चेत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!