Join WhatsApp group

मुर्तिजापूर मध्ये महावितरणच्या खांबांवर उमेदवारांची बेकायदेशीर बॅनरबाजी! आचारसंहीतेचे नियम धाब्यावर

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर – दि. २८. -(प्रेमराज शर्मा) – नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख रस्ते, चौक, गल्ली परिसरात महावितरणच्या विद्युत खांबांवर मोठ्या प्रमाणात निवडणुकीचे बॅनर दिसू लागले आहेत.
शहरातील अनेक उमेदवारांनी यासाठी महावितरणकडून नाहरकत प्रमाणपत्र (NOC) घेतले का, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

महावितरणने NOC दिले असेल तर ते नियमात बसते का?

निवडणूक आयोगाची आचारसंहिता स्पष्ट सांगते की—
शासकीय मालमत्तेवर कोणत्याही पक्षाची, उमेदवाराची किंवा राजकीय प्रचाराची जाहिरात पूर्णपणे बंदी असते.

महावितरण हे सरकारी उपक्रम असल्याने त्याचे विद्युत खांब, ट्रान्सफॉर्मर, सबस्टेशन भिंती यांवर बॅनर लावणे NOC असो वा नसो— आचारसंहितेच्या विरोधातच ठरते म्हणजेच—

महावितरणने NOC दिले असले तरी ते निवडणूक आयोगाच्या नियमांशी विसंगत ठरते.

आचारसंहिता प्राधान्याने लागू होते; त्यामुळे अशा NOC ला कायदेशीर वैधता राहत नाही.

अशा NOC वर आधारित बॅनर लावणे हे कायद्याला चकवा देण्यासारखेच ठरू शकते.

मुर्तिजापूरमध्ये उघडपणे आचारसंहितेचा भंग

मुर्तिजापूर शहरात सध्या अनेक ठिकाणी:

विद्युत खांबांवर चिकटवलेले बॅनर

रातोरात लावलेल्या होर्डिंग्ज

काही पक्षांचे “नियम कुणाला लागू?” असे चित्र

यामुळे आचारसंहितेचे उघड उल्लंघन झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

शासकीय मालमत्तेचा गैरवापर – नियम स्पष्ट

महावितरणच्या नियमांनुसारही:

खांबांवर बॅनर लावणे धोकादायक + अनधिकृत

विद्युत संरचनेचा वापर जाहिरातीसाठी कठोरपणे बंदी

निवडणूक काळात नियम अधिक कडक

मुर्तिजापूरमधील नागरिक विचारतात—
“निवडणूक आली की बॅनरबाजीचा पूर येतो. महावितरण, नगरपालिका, प्रशासन— कोणाकडे नियंत्रण नाही का?”

कारवाई होणार का?

आता लक्ष आहे की:

महावितरण अशा बॅनरवर कारवाई करेल का?

निवडणूक आयोग अशा NOC वर प्रश्न उपस्थित करेल का?

संबंधित उमेदवारांवर दंडात्मक कारवाई होणार का?

मुर्तिजापूर शहरात चाललेल्या बॅनरबाजीमुळे प्रशासनाची भूमिकाच सध्या तपासणीखाली आली आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!