Join WhatsApp group

मुर्तिजापूर प्रभाग क्रमांक ९ मध्ये ‘पॅराशूट’ उमेदवार चालणार का ? — स्थानिक मतदारांत नाराजीचे सावट

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर :दिनांक २७ प्रभाग क्रमांक ९ मध्ये आगामी निवडणुकीत स्थानिक जनमत न जाणणारा, गावातील साधी ओळख नसलेला आणि प्रभागाची मूलभूत रचना न समजणारा ‘पॅराशूट उमेदवार’ मैदानात उतरविण्यात आल्याने प्रभागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विशेष म्हणजे, स्वतःच्या राजकीय अस्तित्वाची दोरी सुटू नये, या भीतीनेच संबंधित उमेदवाराच्या कुटुंबीयांनी त्याला या प्रभागात ढकलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात आहे.

वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार न दिल्याने समीकरणे ढवळून निघाली

प्रभाग क्रमांक ९ मध्ये वंचित बहुजन आघाडीने या वेळेस उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भरकटलेल्या मते एकवटण्याच्या राजकारणाला उधाण येत असून, काही गटांकडून ही रिकामी जागा आर्थिक बळाचा मारा करून भरून काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्थानिक पातळीवर बोलले जात आहे.

‘विशिष्ट समाजाचा आधार’ की मतांचे तुकडे करण्याची खेळी?

या प्रभागात विशिष्ट समाजाच्या आधारावर राजकारण करण्याचा जो प्रयत्न दिसत आहे, तो पूर्ण प्रभागाला विभागण्याचे काम करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. स्थानिक विकास, रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, नागरिकांच्या मूलभूत समस्या बाजूला पडत असून, मतदारांना केवळ समाजाच्या आधारावर गोलबंद करण्याची रणनीती पुढे आणली जात असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.

आर्थिक ताकद दाखवून निवडणूक जिंकण्याचे ‘ऑपरेशन’ सुरू?

प्रभागात आतापासूनच बाहेरून आर्थिक शक्ती दाखवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक पातळीवर सशक्त कार्यकर्ते असताना, अचानक ‘पॅराशूट’ उमेदवार उतरणे आणि त्यासाठी मोठा खर्च ओतला जात असल्याचे दिसत असल्याने हा शुद्ध आर्थिक खेळ असल्याची टीका प्रभागात होत आहे.

स्थानिक मतदारांची प्रतिक्रिया – “ओळख तरी काय? कामाचा इतिहास कुठे?”

मतदार सरळ प्रश्न विचारत आहेत —

  • या उमेदवाराला आमचा प्रभाग माहित तरी आहे का?
  • गावाच्या प्रश्नांसाठी हा उमेदवार कधी रस्त्यावर उतरला का?
  • उमेदवार की कुटुंबाचा राजकीय प्रकल्प?

मतदारांच्या मते, अचानक पॅराशुट ने उतरलेल्या उमेदवाराला प्रभागाचा आत्मा, समस्या आणि वास्तव माहित नसताना निवडणूक ही केवळ राजकीय अस्तित्वाचा खेळ बनत चालल्याची भावना निर्माण झाली आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!