Join WhatsApp group

आदर्श आचारसंहिता आणि कायदा-सुव्यवस्था अंमलबजावणीसाठी मा. जिल्हाधिकार्‍यांचा मुर्तिजापूर शहरातील पाहणी दौरा

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर : दिनांक २७ : मुर्तिजापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ आगामी २ डिसेंबर २०२५ रोजी पार पडणार असून निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शकतेने आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी तयारी सुरू आहे. त्याच अनुषंगाने आज मा. जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा मीनामा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांनी शहरातील संवेदनशील भागांचा संयुक्त दौरा करत आचारसंहिता आणि कायदा-सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीची पाहणी केली.

मतदान जनजागृतीस वेग — स्वाक्षरी अभियानाचा शुभारंभ

मुर्तिजापूर शहरात स्वीप (SVEEP) अंतर्गत १००% मतदानासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या अंगभूत मतदार जनजागृती स्वाक्षरी अभियानाला आज जिल्हाधिकारी महोदया व पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.

मुर्तिजापूर हायस्कूल आणि सेंट आन्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीसाठी प्रभावी पथनाट्य सादर केले. विद्यार्थ्यांनी हॅण्डी पोस्टर, बॅनर आणि घोषणाबाजीच्या माध्यमातून नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले व १००% मतदानासाठी आवाहन केले. उपस्थित अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले.

संविधान दिनाचे औचित्य — उद्देशिका वाचन व श्रद्धांजली

२६ नोव्हेंबर संविधान दिनाचे औचित्य साधत निवडणूक निर्णय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी संविधानाची उद्देशिका वाचून दाखवली.
यानंतर २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि निरपराध नागरिकांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

निवडणूक कामकाजाची आढावा बैठक

नगरपालिका सभागृहात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी सर्व क्षेत्रीय अधिकारी, नोडल अधिकारी, पोलीस पथके आणि निवडणूक यंत्रणेच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त आढावा बैठक घेतली.
अधिकाऱ्यांनी निवडणुकीसंदर्भातील कार्यांची माहिती सविस्तर दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करत काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या.

बैठकीस उपस्थित :

  • जिल्हा सहआयुक्त डॉ. विश्वनाथ वडजे
  • सहा. निवडणूक निर्णय अधिकारी निलेश जाधव
  • अतिरिक्त सहा. निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा बोबडे
  • उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे
  • पोलीस निरीक्षक अजित जाधव

स्ट्राँग रूम व मतदान केंद्रांची पाहणी

आढावा बैठकीनंतर मा. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी

  • स्ट्राँग रूम,
  • मतमोजणी कक्ष,
  • तसेच शहरातील विविध मतदान केंद्रांना भेट देत सुरक्षा आणि आवश्यक सुविधांची पाहणी केली.
    अधिकारी वर्गाच्या तयारीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

Share

Leave a Comment

error: Content is protected !!