Join WhatsApp group

श्री पुंडलिक बाबा गौरक्षण संस्था, मुर्तीजापुर येथे गोपाष्टमी उत्साहात संपन्न

Photo of author

By Sarkarmzanews

Share


प्रतिनिधी – मुर्तीजापुर : ३१ ऑक्टो २५

दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री पुंडलिक बाबा गौरक्षण संस्थान, रेपाळखेड रोड, मुर्तीजापुर येथे गोपाष्टमीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास लोकप्रिय आमदार आ. हरीशभाऊ मारुतीअप्पा पिंपळे, समाजसेविका सौ. नूतनताई पिंपळे, रूपाली तिडके, शालिनीताई हजारे, डॉ. प्रशांत अवघाते, डॉ. हरीश पातोंड तसेच गौरक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री श्यामसुंदर सोमानी यांच्या प्रमुख उपस्थितीत गोपूजन करून गोग्रास देण्यात आला.

संस्थेत कत्तलीपासून वाचवलेल्या जवळपास २५० गोवंशाचे नियमित संगोपन केले जाते. तसेच येथे विविध सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यशाळा नियमितपणे आयोजित केल्या जात असल्याचे संस्थेचे कार्यकर्ते कैलास अग्रवाल यांनी आपल्या प्रस्ताविकेत नमूद केले.

कार्यक्रमादरम्यान श्री महारुद्र मारुती संस्था येथील आरती मंडळाद्वारे महाआरतीचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती, गोभक्त, गोपालक, पत्रकार, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन चंदन अग्रवाल यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल जेठवाणी, मनोहर निमोदिया, विनोद मुळे, गोपाल भरणे, विजयकुमार वर्मा, मंगेश अंबाडेकर तसेच सर्व विश्वस्त व कर्मचारीवर्ग यांनी मेहनत घेतली.


गायीचे महत्त्व — आ. हरीश पिंपळे
आ. हरीशभाऊ पिंपळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “शुद्ध भारतीय जातीच्या गायीच्या पाठीच्या कण्यामध्ये ‘सूर्यकेतू’ नावाची विशेष मज्जातंतू असते. सूर्यकिरणे या मज्जातंतूवर पडल्यास सोन्याचे सूक्ष्म कण तयार होतात, म्हणूनच गायीचे दूध, शेण, गोमूत्र, लोणी आणि तूप पिवळसर व अमृततुल्य असते.”

गायीला प्रेम देणाऱ्यांचे अनेक असाध्य आजार बरे होतात, कारण तिच्या शरीरातून निघणारी सकारात्मक ऊर्जा मन:शांती आणि आरोग्य प्रदान करते. गोमूत्र व शेणाचे औषधी गुणधर्म अनंत असून, त्याच्या उपयोगाने कर्करोग व मधुमेहासारखे आजार दूर होण्यास मदत होते. पशुपालकांनी जर गायीचे योग्य संगोपन केले, तर त्यांना भक्कम आर्थिक स्थैर्य मिळू शकते, असेही आ. पिंपळे यांनी सांगितले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!