Join WhatsApp group

मुर्तीजापुर तालुक्यात चायनीज मांज्याचा कहर; प्रशासन झोपेत, पालक बेफिकीर!

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापुर : २८ ऑक्टो २५ : मुर्तीजापूर तालुक्याचा आकाशात सध्या पतंगांचा जल्लोष सुरू असताना, त्याच आकाशात चायनीज मांज्याची धार नागरिकांच्या जीवाला धोका ठरू लागली आहे. लहान मुलं आनंदात पतंग उडवत आहेत, पण त्यांच्या हातातला धागा किती जीवघेणा ठरू शकतो याची कल्पनाही त्यांना नाही!

शहरातील काही पतंग विक्रेते बेकायदेशीररीत्या चायनीज मांज्याची विक्री करत आहेत. प्रशासनाला सर्व काही ठाऊक असूनही पोलीस आणि नगरपरिषद दोघेही डोळेझाक करत आहेत. काही दिवसांपूर्वीच या घातक मांज्यामुळे एका नागरिकाचा जीव धोक्यात आला होता, तरीही जबाबदार अधिकारी गप्प आहे.

हा चायनीज मांजा फक्त पक्ष्यांचा नाही तर माणसांचाही घातक शत्रू ठरत आहे. दरवर्षी देशभरात शेकडो जखमी होतात, तरीही विक्रेते नफ्याच्या मोहात समाजाचा जीव धोक्यात घालत आहेत.

प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास लवकरच एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीसांनी दुकाने तपासून चायनीज मांजा विकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

पालकांनाही आता जाग येणे आवश्यक आहे — मुलं कोणत्या धाग्याने पतंग उडवत आहेत, तो कुठून आणला आहे याची खबरदारी घेणे व संबंधित अधिकारी वर्गाला याची महिती ही पालकांची जबाबदारी आहे.

आकाशात पतंग झेपावतोय, पण जमिनीवर बेफिकिरीची धार चालली आहे! चुकून आपल्याच कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला दुखापत झाली किंवा जीव गेला तर ?
वेळीच पावले न उचलल्यास, चायनीज मांजा जीवघेणा ठरेल — शहरासाठीही, समाजासाठीही!
आणि याचे जबाबदार फक्त आणि फक्त आपणच राहू.

सजग राहून चायनीज मांज्याला हद्दपार करणे हि सर्वांची जबाबदारी .


Share

Leave a Comment

error: Content is protected !!