Join WhatsApp group

तुकड्यासाठी लाळ चाटणाऱ्यांमुळे निर्भीड लेखणी बदनाम तथाकथित’ पत्रकारितेच्या नावाखाली सुरू असलेल्या खंडणीखोरांना प्रशासनाने वेळीच लगाम घालावा!

Photo of author

By Sarkarmzanews

Share

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखली जाणारी पत्रकारिता आज एका अभूतपूर्व संकटातून जात आहे. एका बाजूला निर्भीडपणे, तळमळीने समाजाचे प्रश्न मांडणारे पत्रकार आहेत, तर दुसऱ्या बाजूला केवळ ‘मी पत्रकार’ आहे, असे भासवून सरकारी कार्यालये आणि कंत्राटदारांच्या दारात ‘हजार-पाचशेच्या तुकड्यासाठी’ लाळ चाटणारे तथाकथित पत्रकारितेच्या नावाखालील खंडणीखोर वाढले आहेत. यामुळे प्रामाणिक आणि सत्यनिष्ठ पत्रकारिता करणाऱ्यांना पत्रकार कडे सर्व सामान्य नागरिक यांचा दृष्टिकोन बदलला जात आहे का?

सत्य दाखवणाऱ्या आरशाला गंज
पत्रकार हा समाजाचा आरसा असतो, त्याचे काम सत्य दाखवणे. काही माध्यमे सत्य दाखवण्यापेक्षा ते लपवण्यात धन्यता मानत असल्याची सामान्य नागरिकांना मध्ये चर्चा आहे.याच सामान्य नागरिक च्या मते नागरिकाचे मुद्दे, प्रश्न , अडीअडचणी चे लिखाण हरवून गेले आहे.पत्रकार नी निर्भीड पणाने सत्य गोड असो वा कडू, ते निडरपणे मांडणे हे त्याचे कर्तव्य. मात्र, सध्या अनेक ठिकाणी पत्रकारिता ही फक्त दिखावा आणि कॉपी-पेस्ट पुरतीच मर्यादित राहिली आहे. ज्यांना बातमी नीट लिहिता येत नाही, ते सुद्धा पत्रकार’ म्हणून मिरवत आहेत.दुसऱ्याची बातमी चोरून आपल्या नावाने प्रसिद्ध करणे, असे प्रकार खुलेआम सुरू आहेत.


या तथाकथित पत्रकारांना समाजाचे खरे मुद्दे, गरिबांच्या अडीअडचणी किंवा व्यवस्थेतील त्रुटी याच्याशी काहीही देणेघेणे नाही. त्यांचे एकमेव लक्ष्य असते: ‘आपल गिफ्ट कोठून मिळेल’ किंवा ‘अमुक एका अधिकाऱ्याकडून आपल्याला किती रुपयांचा तुकडा मिळेल.’ या लोभी वृत्तीमुळे, जेव्हा खऱ्या अर्थाने समाजासाठी लढणारे पत्रकार वर बोट ठेवले जात आहे.या निमित्ताने एक गोष्ट प्रशासनाने आणि समाजाने लक्षात ठेवणे आवश्यक आहे: पत्रकार हा समाजाचा आवश्यक घटक आहे, जेव्हा सर्व सामान्य नागरिक अडीअडचणी मधे सापडत तेव्हा त्याला प्रशासन पेक्षा पत्रकार महत्वाचा वाटत असतो.निर्भीड पने पत्रकारिता करणार पत्रकार हा दिवाळीच्या भेटवस्तू किंवा जाहिरातीसाठी आपली लेखणी अजिबात विकत नाही , समाजातील प्रश्न उपस्थित करून त्या समस्या मार्गी लावण्याचे काम करून प्रशासनाला जाग सुद्धा करतो ,पत्रकार तर अन्याय, भ्रष्टाचार आणि ढोंगीपणाचा ‘शिकारी’ असतो! त्याच्याकडे बंदूक नसते, पण त्याच्याकडे शब्दांचे, पुराव्यांचे आणि जनतेच्या विश्वासाचे अस्त्र असते.


जेव्हा एखादा अधिकारी किंवा नेता सत्तेच्या आणि पैशाच्या नशेत सामान्य माणसाला तुडवतो, नियम पायदळी तुडवतो, तेव्हा तोच पत्रकार ‘शिकारी’ बनतो. त्याचा एक धारदार प्रश्न संपूर्ण सत्तेचे साम्राज्य हादरवून टाकण्याची क्षमता ठेवतो.त्यामुळे निर्भीड पणाने सत्य लिहिणाऱ्या पत्रकाराचे आत्मपरीक्षण करणे आजच्या काळाची गरज आहे. पत्रकार हा समाजाचा सजग ‘प्रहरी’ आहे, पण हे सुद्धा तितकंच सत्य सुद्धा आहे की काही तथाकथित पत्रकार मुळे पत्रकारिता बदनाम सुद्धा आहे.निर्भीड पत्रकार प्रशासनाला व सरकार ला प्रश्न विचारतो.


पत्रकार कोणाचा गुलाम नसतो. तो नात्यांपेक्षा तथ्यांवर जगतो आणि आपल्या लेखणीने सत्तेला जबाबदार ठरवतो. काही मूठभर लोभी लोकांमुळे संपूर्ण पत्रकारितेवर बोट ठेवणे अत्यंत चुकीचे आहे. त्यांना ब्लॅकमेलर’ म्हणून बघणे हा त्या हजारो प्रामाणिक पत्रकारांचा घोर अपमान आहे, जे ऊन-पावसाची तमा न बाळगता सत्य शोधण्यासाठी गावागावात फिरत असतात.


ज्या शासकीय कार्यालयांमध्ये आणि कंत्राटदारांकडे हे ‘तथाकथित तुकडा’ घेणारे पत्रकार घुसखोरी करत आहेत, त्या प्रशासकीय यंत्रणांनी यावर कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे. केवळ ओळखपत्र बघून अशा लोकांना थारा देणे बंद करा. केवळ जाहिरातीच्या मोबदल्यात निष्ठा विकणाऱ्यांना प्रोत्साहन देणे, हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे.
पत्रकाराला कमी लेखू नका. तो दिवाळीच्या गिफ्टसाठी नाही, तर समाजाच्या अंधारात दिवा पेटवण्यासाठी लिहितो. तो पैशाने विकत घेतला जाणारा माणूस नाही, तो सत्याचा योद्धा आहे. आणि जेव्हा त्याचे अस्त्र लेखणी – धारदार होते, तेव्हा कितीही मोठे साम्राज्य असले तरी ते हादरते!


Share

Leave a Comment

error: Content is protected !!