Join WhatsApp group

कानडी गावच्या रस्त्याचा विकास रखडला – ग्रामस्थ त्रस्त

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापुर : दिनांक २४ ऑक्टो. २५ : (प्रतिनिधी) :

मुर्तीजापूर तालुक्यातील कानडी गावात प्रवेश करण्याचा मुख्य रस्ता अद्याप विकासाच्या प्रतीक्षेत आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याचे डांबरीकरण न झाल्यामुळे ग्रामस्थांना येण्या-जाण्यास मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

विशेषतः पावसाळ्यात हा रस्ता चिखलमय होऊन पूर्णपणे वाहतुकीस अयोग्य बनतो. शाळकरी मुले, शेतकरी व वृद्ध नागरिक यांना या रस्त्यावरून चालणे अक्षरशः अशक्य बनते. दररोज या ठिकाणी घसरून पडणे, वाहन घसरून अपघात होणे अशा घटना घडत असल्याने नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

ग्रामस्थांनी वारंवार संबंधित विभागाकडे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना या समस्येबाबत तक्रारी केल्या असूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
“किमान गावात जाणारा रस्ता तरी डांबरीकरण करून द्यावा” अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने केली जात आहे.

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, प्रशासन व लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून या रस्त्याचे काम हाती घ्यावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात येईल.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!