Join WhatsApp group

२२ वर्षांपासून निराधार मुलांसोबत साजरा करतात दिवाळीचा आनंद

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापुर तालुका प्रतिनिधी : संत गाडगे महाराजांच्या विचारांनी प्रेरित होत सामाजिक कार्यकर्ता संतोष भांडे पाटील यांनी गेल्या २२ वर्षांपासून निराधार आणि गरजू मुलांसोबत दिवाळी साजरी करण्याची परंपरा जपली आहे.

मुर्तीजापुर तालुक्यातील लंगापूर येथील निराधार मुले शुभम वानखडे आणि संतोष वानखडे यांनी बालपणीच आई-वडिलांचे छत्र गमावले. सध्या ते आपल्या आजीबरोबर राहतात. या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी, तसेच संत गाडगे बाबांच्या आदर्शातून प्रेरणा घेऊन, संतोष भांडे यांनी गेल्या दोन दशकांहून अधिक काळ ही जबाबदारी स्वतःहून स्वीकारली आहे.

प्रत्येक वर्षी दिवाळीनिमित्त ते या मुलांना कपडे, फराळ, दिवाळीचा किराणा आणि इतर आवश्यक वस्तू देऊन आनंद देतात.

तसेच, एका अपघातात दोन्ही हात निकामी झालेल्या श्याम मातेकर या गरजू व्यक्तीला सुद्धा भांडे यांनी मदतीचा हात दिला आहे.
ते संत गजानन महाराज बहुउद्देशीय संस्था चे सचिव आणि देवांश पुष्पश्री शेतकरी बचत गट चे अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत.

अशा संवेदनशील कार्यामुळे संतोष भांडे पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांचे कार्य गाडगेबाबांच्या मानवतावादी विचारांना उजाळा देणारे ठरत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!