Join WhatsApp group

येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये राजकारण की समाजकारण? मुर्तीजापूर शहरात ‘मत पळवा-पळवी’चा धक्कादायक प्रकार!

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक १५ ऑक्टोबर २५ :

मुर्तीजापूर – ✒️ प्रेमराज शर्मा

मुर्तीजापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजताच शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. अशातच शहरात ‘मत पळवा-पळवी’चा धक्कादायक प्रकार समोर आल्याची चर्चा रंगली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, प्रभागांची नव्याने झालेली रचना झाली असून याचा गैरफायदा काही माजी नगरसेवकांनी घेतला असून अधिकाऱ्यांशी संगनमत करून एका विशिष्ट समाजाचे मत अगोदरच “सेटिंग” करून एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात टाकल्याची माहिती पुढे आली असून त्यामुळे शहरातील भावी नगरसेवकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

मूर्तिजापूर नगरपरिषदेत अनेक वर्षांपासून काही मोजके नगरसेवक प्रभाव गाजवत असून त्यांनी नगरपरिषदेतील काही कर्मचाऱ्यांवर आपली पकड मजबूत ठेवली आहे. या अंतर्गत व्यवहारांना स्थानिक नागरिक “इंटरनल सेटिंग” असे म्हणत आहेत.

दरम्यान, या मतांतील फेरबदलाचा मुद्दा काही भावी नगरसेवकांनी शहरातील एका संवैधानिक पदावर कार्यरत असलेल्या नेत्याच्या लक्षात आणून दिल्यानंतर परत सावरा-सावर सुरू झाल्याचे समजते.

आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की, मूर्तिजापूरचे राजकारण समाजकारणावर चालते आहे की फक्त सत्तेच्या राजकारणावर?

२७ ऑक्टोबरपर्यंत या मतांची पुनर्रचना पूर्ववत होणार की, राजकीय फायद्यासाठी ती तसेच ठेवली जाणार, हे आगामी काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

या प्रकरणात काही नगरपरिषद अधिकाऱ्यांवर भविष्यात निलंबनाची कारवाई होण्याचा इशारा संवैधानिक पदावर कार्यरत असल्याने नेत्यांनी दर्शविला आहे.

त्यामुळे नगरपरिषदेत सध्या काहीं अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सावरा-सावर सुरू असल्याचे वृत्त आहे.

मुर्तीजापूर शहरातील या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!