Join WhatsApp group

मूर्तिजापूर शहरात अचानक गुटख्याचा तुटवडा – पानटपरीवाल्यांची धावपळ, नागरिक म्हणतात “हा गुटखा बंद की नाट्य प्रकरण?”

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर (०९ ऑक्टोबर २५):शहरात अचानक गुटखा बंद झाल्याने पानटपरीवाल्यांची अक्षरशः धावपळ सुरू झाली आहे. नेमका गुटखा का बंद झाला याचे कारण अद्याप कोणालाच समजलेले नाही. कुणी म्हणतं पोलिसांनी ताकीद दिली, तर कुणी म्हणतं ठोक व्यापाऱ्यांनी भाव वाढवण्यासाठी “गुटखा गायब” केला!

दरम्यान, शहरातील बुद्धिजीवी वर्ग मात्र या गुटखा बंदीचं स्वागत करतो आहे. “हा बंद कायमचा व्हावा, म्हणजे किमान रस्त्यावर गुटख्याचे थुंकीचे लाल ठिपके तरी कमी होतील,” अशी चतुर टिप्पणी काही नागरिकांनी केली. पण लगेचच दुसरा सवालही विचारला जातोय — “पोलीस प्रशासन खरंच आळा घालेल का, की हेही काही दिवसांचं नाट्य आहे?”

काही पानटपरीवाल्यांनी तर विनोदातच सांगितलं, “गुटखा बंद झाला, पण ग्राहकांनी आता पान मसाल्याला पण मागणी वाढवलीये… थोडक्यात, धंदा तरी सुरूच आहे, फक्त फ्लेवर बदललाय!”

शहरात या “गुटखा नाट्याला” सध्या रंगत आलेली असून, नागरिक सोशल मीडियावरही मजेशीर पोस्ट टाकून परिस्थितीवर फुलझड्या उडवत आहेत. शेवटी ही बंदी खरी की फक्त गुटख्याचा “इंटरव्हल ब्रेक” — हे लवकरच कळेल!


Share

Leave a Comment

error: Content is protected !!