Join WhatsApp group

मूर्तिजापूर : उमा बॅरेज प्रकल्पातील कोटींचा घोटाळा उघडकीस – आमदार हरीश पिंपळे यांच्या उपस्थितीत नागपूर येथे तातडीची बैठक

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर:दिनांक १३ सप्टेंबर २५ : मूर्तिजापूर तालुक्यातील उमा-रोहणा बॅरेज प्रकल्पात तब्बल ९ कोटी रुपयांचा महाघोटाळा उघड झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

कंत्राटदाराने कामात हलगर्जीपणा करत करारनाम्यातील अटी मोडीत काढल्या असून, काही अधिकाऱ्यांनी यामधून मलिदा लाटल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या अकोला सिंचन मंडळातील तत्कालीन चार वरिष्ठ अधिकारी वतीने कंत्राटदार अशा ७ जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

२२ ऑगस्ट २०२५ रोजी माना पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, १ मार्च २०११ ते ३१ मार्च २०१२ दरम्यान प्रकल्पातील द्वारनिर्मिती व उभारणीच्या कामात अतिप्रदान करून शासनाला कोट्यवधी रुपयांचे नुकसान पोहोचविण्यात आल्याचा आरोप आहे.

या प्रकरणाचा तपास अकोला आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला असून, घोटाळ्याची रक्कम ९ कोटींवरून अधिक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.याबाबत मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी १२ सप्टेंबर रोजी नागपूर येथे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक तसेच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

या बैठकीत उमा प्रकल्पासह मतदारसंघातील प्रलंबित विकास कामांचा आढावा घेण्यात आला.या दरम्यान उमा बॅरेजच्या कंत्राटदार गंगाधर रेड्डी यांच्याकडून तब्बल ३२ कोटी रुपये वसूल करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समोर आले. लोक नेता समिती मुंबईमार्फत ही रक्कम १५ टक्के व्याजासह वसूल करण्यात येणार असून, आतापर्यंत व्याजासह २२ कोटी रुपयांचे देणे थकित असल्याचे निष्पन्न झाले आहे.

तातडीने पैसे जमा न झाल्यास संबंधित कंत्राटदारांच्या मालमत्तेला सील करून वसुली करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.या महत्त्वपूर्ण बैठकीला अधीक्षक अभियंता अकोला सिंचन मंडळ अक्केवार, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग अकोला वाकोडे, लघू पाटबंधारे विभाग अकोला सानप उपस्थित होते.

👉 “उमा प्रकल्पातील भ्रष्टाचारामधील अपहारलेली रक्कम कंत्राटदारांकडून वसूल केली जाणार असून, मतदारसंघातील सर्व प्रलंबित विकास कामांना गती देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येतील,” असे आश्वासन आमदार हरीश पिंपळे यांनी दिले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!