Join WhatsApp group

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचा उत्साहपूर्ण समारोप – ११० प्राध्यापक, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक व संघटकांचा सन्मान

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला : स्व. मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिना निमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय क्रीडा दिनाचे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

दि. २९ ऑगस्ट रोजी खासदार अनुप धोत्रे यांच्या हस्ते क्रीडा रॅलीचे उद्घाटन झाले. यावेळी आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी वर्षा मीना उपस्थित होते.

या दिवशी राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कारही करण्यात आला.दि. ३० ऑगस्ट रोजी सकाळी मॅरेथॉन स्पर्धा व संध्याकाळी क्रीडा विषयक चर्चासत्राचे आयोजन झाले.

त्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी सकाळी सायकल रॅली काढण्यात आली व संध्याकाळी समारोपीय कार्यक्रम पार पडला.

समारोप कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आमदार साजिद खान पठाण तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. किशोर मालोकर, ऑल इंडिया कॅरम फेडरेशनचे सचिव प्रभजीतसिंग बच्छेर, प्रा. प्रदीप थोरात, श्री. बुडन गाडेकर, प्रा. नरेंद्र बुजरूक, प्रा. राजेश चंद्रवंशी, प्रा. राजेंद्र अलसेट, प्रा. बाळूभाऊ आगासे उपस्थित होते. तसेच हॉकीचे वरिष्ठ राष्ट्रीय खेळाडू गुरुमीतसिंग गोसल, माजी उपायुक्त व राष्ट्रीय खेळाडू संजय बैस, जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. सतीशचंद्र भट्ट उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते वयोवृद्ध खेळाडूंचा शाल-सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. राष्ट्रीय स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या आंतरराष्ट्रीय खेळाडू हरिवंश टावरी यांना महाराष्ट्र शासनाकडून तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले असून त्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

अकोला जिल्ह्यातील जवळपास ११० खेळाडू, क्रीडा शिक्षक, महिला क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक, पंच व संघटकांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सतीशचंद्र भट्ट यांनी केले तर सूत्रसंचालन जिल्हा संघटक राजेश गावंडे यांनी केले. समारोप सोहळा यशस्वी करण्यासाठी क्रीडा अधिकारी मनीषा ठाकरे, डॉ. अभिजित फिरके, मार्गदर्शक सुरजकुमार दुबे, डॉ. नलिनी जाधव यांच्यासह जिल्हा क्रीडा कार्यालयातील कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!