Join WhatsApp group

अत्याचार व हुंडाबळीची तक्रार, पतीसह सासुरवाडीतील ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापुर (दिनांक ३० ऑगस्ट) – मुर्तीजापुर शहर पोलिस ठाण्यात पतीसह सासु, सासरे, जेठ व जेठानी यांच्याविरुद्ध अत्याचार, मारहाण व हुंडाबळीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी स्वाती संदीप तायडे (वय ३१, व्यवसाय – घरकाम, रा. शेजल निवास, तिडके नगर, मुर्तीजापुर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.फिर्यादीचे लग्न १३ जून २०१५ रोजी संदीप रामदास तायडे (वय ३८) यांच्याशी झाले.

मात्र लग्नानंतर एक महिन्यापासूनच सासुरवाडीतील मंडळींनी तिला मानसिक व शारीरिक छळ सुरू केला.

विवाहित महिलेला शिळे अन्न देणे, अपमानास्पद टोमण्यांनी मानहानी करणे, तसेच थापड्या–बुके मारून त्रास देत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

तसेच, “तुझ्या वडिलांकडून २५ लाख रुपये आण, अन्यथा तुला फारगती देऊ” अशा धमक्या दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. आरोपींनी जीवे मारण्याची धमकी देखील दिली असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी पती संदीप रामदास तायडे, सासु सुशिला रामदास तायडे (वय ६५), सासरे रामदास मारोती तायडे (वय ७०), जेठ विनोद रामदास तायडे (वय ४५) व जेठानी सुषमा विनोद तायडे (वय ४०) यांच्याविरुद्ध भा. न्या. संहिता २०२३ चे कलम ८५ व ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपास उपनिरीक्षक नितीन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल शाम मडावी करीत आहेत.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!