Join WhatsApp group

१ सप्टेंबरपासून मुंबई-हावडा दुरांतो एक्सप्रेसला खासदार धोत्रे यांच्या प्रयत्नामुळे अकोल्यात थांबा!

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला, २९ ऑगस्ट: अकोल्यातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे, रेल्वे मंत्रालयाने खासदार अनुप धोत्रे यांच्या मागणीची दखल घेऊन रेल्वेमंत्री नामदार अश्विनी वैष्णव यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) – हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) दुरांतो एक्सप्रेस (गाडी क्रमांक १२२६१/१२२६२) ला अकोला जंक्शन येथे प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

हा थांबा १ सप्टेंबर, २०२५ पासून पुढील आदेश येईपर्यंत सुरू राहील, गाडी क्र. १२२६१ (मुंबई ते हावडा): ही गाडी अकोला येथे मध्यरात्री ००:४० वाजता येईल आणि ००:४२ वाजता पुढे रवाना होईल.गाडी क्र. १२२६२ (हावडा ते मुंबई): परतीच्या प्रवासात ही गाडी अकोला येथे रात्री २३:५३ वाजता पोहोचेल आणि मध्यरात्री २३:५५ वाजता सुटेल.

आठवड्यातून चार दिवस धावणाऱ्या दुरांतो एक्सप्रेसला अकोला येथे थांबा मिळाल्याने येथील प्रवाशांची मुंबई आणि हावडा येथे जाण्यासाठी जलद व कमी थांब्यात पोहोचण्याची सुविधा मिळणार आहे.खासदार अनुप धोत्रे सातत्याने रेल्वे प्रवाशांना सुविधा मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून सुविधा उपलब्ध करून देत आहे त्याचा लाभ मुंबई आणि हावडा येथे जाणाऱ्या अप्रवासी यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.

अकोल्यात अनेक कलकत्ता या भागातील नागरिक राहतात. त्यांच्यासाठी सुविधा झाली आहे तसेच मुंबई येथे जाणाऱ्या रात्री उशिरा जाऊ सकाळी पोहोचण्यासाठी मुंबईला जाऊ शकतात त्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.

यात्रेची थांबा संख्या यावर अवलंबून आहे. हावडा-मुंबई दुरांतो एक्सप्रेस २८ सप्टेंबर २००९ रोजी सुरू झाली होती आणि जवळपास १६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तिला आता अकोल्यात खासदार धोत्रे यांच्यामुळे थांबा मिळाला आहे.

खासदार धोत्रे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच रेल्वे बोर्डाचे आभार व्यक्त केले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!