Join WhatsApp group

राज्य कर्मचारी संघटना अकोला जिल्हा अध्यक्षपदी विजय लकडे यांची निवड

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर – दिनांक २९ ऑगस्ट २५: महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी संघटनेच्या अकोला जिल्हा अध्यक्षपदी मुर्तिजापूर नगरपरिषदेचे कर्मचारी विजय गोविंदराव लकडे यांची एकमताने निवड करण्यात आली.

संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पोसतोडे व संघटना प्रमुख विश्वनाथ घुगे यांच्या स्वाक्षरीने त्यांना नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले.

राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायतीतील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या — चार महिन्यांपासून थकीत वेतन, 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे एक स्तर, सफाई कामगारांना मोफत घरे, सर्व कर्मचाऱ्यांचा समावेश अशा मागण्यांसाठी ९ सप्टेंबर २०२५ रोजी आझाद मैदान ते मंत्रालय “आक्रोश मोर्चा” काढण्यात येणार असून अकोला जिल्ह्यातील सर्व कर्मचारी, अधिकारी, पाणीपुरवठा व सफाई कामगार तसेच कंत्राटी कामगारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी जिल्हाध्यक्ष विजय लकडे यांनी केले.

नियुक्ती प्रसंगी अकोला जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात अकोला जिल्हा अध्यक्ष म्हणून श्री. विजय गोविंदराव लकडे यांच्या निवडीबद्दल मुर्तिजापूर नगरपरिषदेचे अध्यक्ष शिरीष गांधी, उपाध्यक्ष नरसिंग इतवारी चावरे, कोषाध्यक्ष मसरूर खान, तसेच जिल्हा संघटक प्रवीण शर्मा यांनी अभिनंदन केले. यावेळी नगरपरिषद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!