Join WhatsApp group

मोठा भ्रष्टाचार उघड – उमा बॅरेज प्रकल्पातील 9 कोटींचा महाघोटाळा 27 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता?

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर : प्रेमराज शर्मा :

अकोला जिल्ह्यातील उमा बॅरेज प्रकल्पातील कामामध्ये तब्बल ९ कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याचे धक्कादायक प्रकार उघड झाले आहेत. या घोटाळ्याची रक्कम प्रत्यक्षात २७ कोटींपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचे विधान मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी केले आहे.

विश्वासनीय सूत्रांच्या माहितीनुसार, या घोटाळ्यादरम्यान लोखंडी पाईप व इतर साहित्य खरेदीसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला. मात्र, प्रत्यक्ष साहित्य न आणता कागदोपत्री बनावट बिले दाखवून शासनाची दिशाभूल करून कोट्यवधींचा अपहार करण्यात आला.

याप्रकरणी आमदार हरीश पिंपळे यांनी सातत्याने पाठपुरावा करून ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. परिणामी, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या अकोला सिंचन मंडळातील तात्कालीन चार वरिष्ठ अधिकारी व तीन कंत्राटदार अशा एकूण सात जणांविरुद्ध भा.द.वी. कलम 406, 409, 417, 420, 468, 471, 120 (ब) अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल झाले.

फिर्यादी गौरव प्रकाशराव बोबडे (सहाय्यक अभियंता) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा माना पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला असून पुढील तपास अकोला आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

📌 घोटाळ्याची पार्श्वभूमी

दिनांक 1 मार्च 2011 ते 31 मार्च 2012 दरम्यान हा भ्रष्टाचार झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. यामध्ये बनावट बिलांच्या आधारे शासनाकडून निधी काढण्यात आला आणि शासनाला कोट्यवधी रुपयांचे नुकसान पोहोचविण्यात आले.

📌 आमदार हरीश पिंपळे यांची भूमिका> “उमा बॅरेज प्रकल्प शेतकऱ्यांसाठी जीवनदायी आहे. त्याला मी ७६० कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून दिली. मात्र, मागील घोटाळेबाज ठेकेदारांवर मी कधीही हयगय करणार नाही. दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.”

📌 नागरिकांचा प्रश्नहा घोटाळा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आर्थिक घोटाळ्यांपैकी एक मानला जात असून नागरिकांमध्ये संभ्रम पसरला आहे –

“खरोखरच दोषींवर कठोर कारवाई होईल का? की नेहमीप्रमाणे प्रकरण दाबले जाईल?”

📌 नागरिकांचे मत–

“आरोप सिद्ध झाले तर आरोपींवर कडक कारवाई करून उमा बॅरेज प्रकल्प तातडीने सुरू करावा. यामुळे पिण्याचे पाणी व शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल.”— किशोर नाईक, माजी सरपंच, पोही

🔴 या प्रकरणावर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून तपासानंतर आणखी कोणत्या मोठ्या नावांचा उलगडा होतो, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!