Join WhatsApp group

“एका कुत्र्याने चावले म्हणून शिक्षा सर्वांना का?” प्राणी प्रेमींचा सवाल

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला – “एका कुत्र्याने माणसाला चावा घेतला म्हणून संपूर्ण जातीला गुन्हेगार ठरवणं योग्य आहे का?” – असा थेट सवाल प्राणीप्रेमी व सामाजिक संघटनांकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उपस्थित करण्यात आला आहे.

११ ऑगस्ट २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार दिल्लीतील लाखो भटक्या कुत्र्यांना पकडून शेल्टर होममध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, हा निर्णय २२ ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आला. या आदेशामुळे निरोगी व निरपराध कुत्र्यांना देखील कैदेत ठेवावे लागले असते.

“ही शिक्षा कुत्र्यांची नव्हे तर माणसांच्या दुर्लक्षाची आहे,” अशी भावना प्राणीप्रेमींनी व्यक्त केली आहे.खरी जबाबदारी कोणाची?

शहरातील कचऱ्याचे ढीग, उघड्यावर टाकलेले अन्न, नाल्याजवळ भटकणारी पिल्लं – हे दृश्य कुत्र्यांनी नव्हे तर माणसांनी निर्माण केले आहे.

उपाशीपोटी भटकणाऱ्या या कुत्र्यांवर दोष टाकणे ही अन्यायकारक वृत्ती असल्याचे मत प्राणीप्रेमी व्यक्त करत आहेत.

उपाय काय?

सर्व भटक्या कुत्र्यांचे नसबंदीकरण करून लोकसंख्या नियंत्रणात आणणेदरवर्षी रेबीज लसीकरण करून आजारांवर नियंत्रणफक्त जखमी, आजारी, आक्रमक कुत्रे शेल्टरमध्ये ठेवणे.

निरोगी कुत्र्यांना बंदिस्त करणे टाळणे

“एका गाडीने अपघात केला म्हणून सर्व गाड्यांवर बंदी येत नाही; मग एका कुत्र्याने चावा घेतला म्हणून सर्व भटक्या कुत्र्यांना ठेचून मारणे योग्य ठरेल का?”

– असा सवाल सामाजिक कार्यकर्त्यांनी केला.मानवतेचा प्रश्न प्राणी प्रेमींनी खंत व्यक्त केली की, समाजात अनेक गंभीर अपराध करणारे व्यक्ती मोकाट फिरतात; मात्र दगड मारल्यावर चावणाऱ्या कुत्र्यालाच ठार मारले जाते. “हेच का माणुसकी?” असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश (२२ ऑगस्ट २०२५)कोणालाही अनावश्यक पणे भटक्या कुत्र्यांना पकडून दुसरीकडे सोडता येणार नाही.

महानगरपालिकेने कुत्र्यांची नसबंदी करून त्यांना अँटी रेबीज लस देणे आवश्यककुत्र्यांना त्यांच्या मूळ क्षेत्रातच परत सोडणे बंधनकारक प्राणी संवेदनशीलतेसाठी आवाहन”कुत्रे मारून किंवा कैदेत ठेवून सुरक्षितता मिळणार नाही.

उलट सहअस्तित्वाचा मार्ग स्वीकारलाच पाहिजे. हा लढा फक्त कुत्र्यांचा नाही, तर मानवतेचा आहे,”

असे गौ पालिनी जीव सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा ॲड. राखी ओमप्रकाश वर्मा यांनी सांगितले.अधिक माहितीसाठी संपर्क: 📞 7385350701


Share

Leave a Comment

error: Content is protected !!