Join WhatsApp group

मुर्तिजापूर तालुक्यात ढगफुटी सदृश पावसामुळे पिकांचे नुकसान; वंचित बहुजन आघाडी कडून शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची मागणी

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर (प्रतिनिधी) :दिनांक १६ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट २०२५ दरम्यान मुर्तिजापूर तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेतांमध्ये पाणी शिरून खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

शेतकऱ्यांचा हिता साठी वंचित बहुजन आघाडीने आज उपविभागीय अधिकारी कार्यालय मुर्तीजापुर येथे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अद्याप शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही तसेच नुकसानीचे सर्वेक्षणसुद्धा सुरू झालेले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घ्यावे लागू नयेत यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

वंचित बहुजन आघाडी, मुर्तिजापूर तालुक्याच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की,

पिकांचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत,

शेतकऱ्यांना शासनाकडून त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी,

तसेच पुरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करण्यात यावे.

वंचित बहुजन आघाडी ही शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सतत लढणारा व शेतकरीहितासाठी तत्पर असलेला पक्ष असून, शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेत असतो, असे आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

शासनाने जर तात्काळ निर्णय घेतला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आघाडीने दिला आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!