Join WhatsApp group

राज्यात 41 मद्यनिर्मिती उद्योगांना 328 नवे परवाने; भाजप व राष्ट्रवादी नेत्यांच्या निकटवर्तीयांना लाभ

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुंबई : राज्य सरकारने मद्यनिर्मिती उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा देत तब्बल ३२८ नवीन परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ४१ उद्योगांना नवे परवाने मंजूर होणार असून, भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादी पक्षांशी संबंधित अनेक नेत्यांचे निकटवर्तीय या निर्णयाचे मोठे लाभार्थी ठरणार आहेत. सरकारने राज्याच्या तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात असले, तरी यावरून तीव्र राजकीय वादळ उठण्याची चिन्हे आहेत.

यामध्ये भाजपच्या पाच नेत्यांशी संबंधित कंपन्यांना ४० परवाने तर ९६ परवाने राजकीय नेत्यांच्या कुटुंबीयांना मिळणार आहेत.

🔹 माजी मंत्री बळीराम हिरे यांचा मुलगा प्रसाद हिरे यांच्या डेल्टा डिस्टिलरीजला परवाना

🔹पंकजा मुंडे यांचे पुत्र आर्यमन पालवे यांच्या रॅडीको एनव्ही डिस्टिलरीजला परवाना

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पुत्र सारंग गडकरी यांच्या मानस ग्रो इंडस्ट्रीजला परवाना

🔹आमदार अतुल भोसले व सुभाष देशमुख यांच्या पुत्रांच्या लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज*ला परवाना

तसेच,

🔹 माजी आमदार संजय मामा शिंदे संचालित विठ्ठल कॉर्पोरेशनला परवाना

🔹 आमदार राजन पाटील यांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या नक्षत्र डिस्टिलरीज आणि ब्रुवरीजला परवाना

🔹 जय पवार यांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या दोन कंपन्यांना परवाने

🔹 जयंत पाटील यांचा पुत्र प्रतिक पाटील यांच्या राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याला नवा परवाना

राजकीय घराणेशाहीच्या छायेत घेतलेला हा निर्णय राज्यात नवा वाद पेटवणारा ठरण्याची शक्यता आहे. एकीकडे तिजोरीवरील भार कमी करण्याचे सरकारचे धोरण असले तरी, दुसरीकडे सर्वाधिक लाभ हे सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेत्यांच्या नातेवाईकांना झाल्याने निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!