Join WhatsApp group

गावातील महिलांचा स्फोटक बंड; अवैध दारू धंद्याचा चुराडा

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला : अकोला शहराजवळील गुडदी गावात रविवारी महिलांचा संताप स्फोटून बाहेर पडला. २४ ऑगस्ट २५ रोजी गावात बिनधास्त सुरू असलेल्या अवैध दारू धंद्याविरोधात पोलिसांनी पूर्णतः कानाडोळा केल्याने महिलांनी अखेर न्याय हाती घेतला. डझनभर महिलांनी एकत्र येत दारूच्या टपऱ्या, टीनशेड, हातगाड्या आणि साठा चक्काचूर करून टाकला.

महिलांनी उघडपणे आरोप केला की, “पोलिसांकडे वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नाही. उलट पोलिस डोळेझाक करून दारूवाल्यांना संरक्षण देतात. आमच्या युवकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे, म्हणून आम्हीच कारवाई केली.”

गावात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र, सिव्हील लाईन पोलीस ठाण्याच्या निरीक्षिका मालती कायटे यांनी नेहमीसारखीच भूमिका घेत सांगितले की, “यापूर्वी कोणतीही औपचारिक तक्रार आमच्याकडे नव्हती. महिलांनी अचानक तोडफोड केली. अद्याप कोणताही गुन्हा दाखल नाही.”

यावर संताप व्यक्त करत महिला नेत्या म्हणाल्या, “आम्ही पोलिसांकडे कित्येकदा तक्रारी दिल्या, पण त्या फाडून टाकल्या गेल्या. जर प्रशासन निष्क्रिय असेल तर आम्ही संघर्ष अधिक भयंकर करू. आमच्या मुलांना दारूच्या आहारी जाऊ देणार नाही.”

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “मला या घटनेची माहिती नव्हती. जर असे झाले असेल तर चौकशी करून कठोर कारवाई होईल.”

लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वीच अर्चित चांडक यांनी ‘ऑपरेशन प्रहार’ सुरू करून अवैध धंद्यांवर गदा आणण्याची घोषणा केली होती.

मात्र, गुडदी गावातील रविवारीची घटना हेच दाखवते की सिव्हिल लाईन पोलिसांच्या घोषणा फक्त कागदावर राहतात. जनतेचा संयम संपला असून, महिलांनी स्वतःचा ‘जनतेचा न्याय’ देत पोलिस प्रशासनाच्या अपयशावर शिक्कामोर्तब केले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!