Join WhatsApp group

महिलांच्या आरोग्यासाठी डॉ. रश्मी शर्मा यांचे प्रेरणादायी पाऊल

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तीजापूर (दि. २३ ऑगस्ट २०२५) : “आरोग्य हीच खरी संपत्ती” या तत्त्वाला मूर्त रूप देत, मूर्तीजापूर येथे महिलांसाठी कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. विदर्भ विपरीत नारी शक्ती सेवा संस्था, राजस्थानी ब्राह्मण महिला मंडळ आणि संत तुकाराम हॉस्पिटल, अकोला यांच्या सहकार्याने आयोजित हा उपक्रम डॉ. रश्मी विक्रमजी शर्मा यांच्या प्रेरणेने शक्य झाला.

समाजातील महिलांना गंभीर आजारापासून वाचविण्याची धडपड करताना डॉ. रश्मी शर्मा यांनी दाखवलेली दूरदृष्टी आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. “आजारी पडण्यापूर्वी संरक्षण” हा त्यांचा ठाम विश्वास असून, त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे ९ ते ३६ वयोगटातील १०० हून अधिक महिलांना ही लस मोफत उपलब्ध झाली. बाजारात सुमारे २५०० रुपयांची किंमत असलेली ही लस गरीब व गरजू महिलांना परवडणे अवघड असते. परंतु डॉ. शर्मा यांनी सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन आर्थिक अडथळे दूर करत सर्वांना ती विनामूल्य करून दिली.

या शिबिरातून महिलांना केवळ आरोग्यदायी भविष्य मिळाले नाही, तर “महिला सशक्तीकरणाचा नवा अध्याय” लिहिला गेला. मूर्तीजापूर तालुक्यातील महिलांना कॅन्सरसारख्या घातक आजाराच्या सावटातून वाचविण्याचे सामूहिक कार्य म्हणजे समाजाला दिलेली अमूल्य देणगी आहे.

या यशस्वी उपक्रमात श्रीमती गीता शर्मा, डॉ. विक्रम शर्मा, सौ. ज्योती शर्मा, सौ. किरण शर्मा, सौ. शितल जोशी, श्रीमती किरण शर्मा, श्रीमती कीर्ती शास्त्री, नंदिनी शर्मा,तसेच श्री राम जोशी, हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी आणि महिला मंडळांचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आमदार हरीश पिंपळे, समाजसेवक कमलाकर गावंडे, अमित नागवान, आदी मान्यवर उपस्थित होते.

परंतु या सर्व यशामागे असलेली प्रेरणा, चिकाटी आणि समाजभान म्हणजे डॉ. रश्मी शर्मा. त्यांच्या नेतृत्वामुळे हे शिबिर केवळ वैद्यकीय उपक्रम न राहता, एक सामाजिक चळवळ बनले आहे मूर्तीजापूर तालुक्याला कॅन्सरमुक्त करण्याच्या दिशेने त्यांनी उचललेले हे पाऊल इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदले जाईल. अशी प्रतिक्रिया आमदार हरीश पिंपळे यांनी दिली.

डॉ. रश्मी शर्मा यांचे कार्य म्हणजे—समाजाप्रती असलेली संवेदनशीलता, आरोग्याविषयी असलेली बांधिलकी आणि महिलांच्या सशक्तीकरणाचा खरा मार्ग!


Share

Leave a Comment

error: Content is protected !!