Join WhatsApp group

मूर्तिजापूर शहरात महिलेला घरात घुसून शिवीगाळ व विनयभंग; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर (दि. 21 ऑगस्ट 2025) – मूर्तिजापूर शहरात महिलेला घरात घुसून शिवीगाळ, विनयभंग व जीवाने ठार मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी पाच आरोपींविरोधात मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी एका विवाहित महिलेने (वय 30, व्यवसाय – घरकाम, रा. टेलिफोन कॉलनी, मूर्तिजापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 20 ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा वाजता आरोपी सनी दुबे (25), वैभव कोकाटे (24), योगेश कोकाटे (22), आकाश उइके (23) व यश केसले उर्फ चीन्ना (24, सर्व रा. सत्संग भवन, स्टेशन विभाग, मूर्तिजापूर) यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून तिच्या घरात घुसून अश्लील शिवीगाळ करत विनयभंग केला.

फिर्यादीने विरोध केल्यावर आरोपींनी तिचा हात धरून ओढले, ढकलून दिले तसेच मोहल्यातील लोकांसमक्ष अश्लील शिवीगाळ करून तिचा अपमान केला. त्याचबरोबर जीवाने ठार मारण्याची धमकीही दिली.

याप्रकरणी अप क्रमांक 399/2025, कलम 74, 189(2), 189(4), 190, 191(1), 191(2), 296, 333, 351(3) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर प्रकरणी दाखल अधिकारी हेडकॉन्स्टेबल श्याम मडावी असून, तपास अधिकारी API अनिल पवार मूर्तिजापूर शहर पोलीस ठाणे यांच्याकडे तपास सुरू आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!