Join WhatsApp group

जनतेसाठी धडाडीची भूमिका; आमदार हरीश पिंपळेंची उपजिल्हा रुग्णालयावर अचानक धडक

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर : दिनांक २० ऑगस्ट २५ :

दि. १९ ऑगस्ट, रोजी शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या स्वतः पुढाकार घेऊन सोडविण्याची जबाबदारी स्वीकारत मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी आज दुपारी साडेचार वाजता लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली.नागरिकांच्या तक्रारी थेट ऐकून घेणारे, अधिकार्‍यांना जाब विचारणारे आणि ठोस कारवाईचे आदेश देणारे आमदार पिंपळे यांनी पुन्हा एकदा आपला जनतेशी असलेला घनिष्ट नातं सिद्ध केले.

धक्कादायक वास्तव समोर

रुग्णालयात प्रवेश करताच आमदारांच्या नजरेस मोठी रुग्णांची गर्दी दिसली, पण महत्त्वाचे डॉक्टर व कर्मचारी गैरहजर होते. हजेरीपत्रकाची तपासणी केली असता गंभीर अनियमितता स्पष्ट झाली.रुग्णांना योग्य उपचार न मिळाल्याने नागरिकांनी आपली व्यथा आमदारांसमोर मांडली. जनतेच्या यातना ऐकताच आमदारांच्या चेहऱ्यावर संताप स्पष्ट दिसत होता.

“जनतेच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही”

कडक शब्दांत इशारा देताना आमदार पिंपळे म्हणाले,”हे रुग्णालय जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचे असून येथे नागरिकांना योग्य सेवा मिळायला हव्यात. मात्र निष्काळजी कर्मचारी लोकांच्या जिवाशी खेळत आहेत. हा हलगर्जीपणा मोठा अपघात घडवू शकतो. जनतेच्या आरोग्याशी असा खेळ मी कधीच होऊ देणार नाही.”

ठोस आदेश – १५ दिवसांचा पगार कपात!

या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदारांनी तात्काळ जिल्हा शल्यचिकित्सकांना फोन करून गैरहजर कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले. दोषींवर थेट १५ दिवसांचा पगार कपात करण्याचा आदेश देत त्यांनी प्रशासनाला स्पष्ट संदेश दिला –”जनतेची सेवा प्रामाणिकपणे करा, अन्यथा परिणाम भोगावे लागतील.”

प्रशासनात खळबळ, जनतेत समाधान

आमदारांच्या या आकस्मिक भेटीने रुग्णालय प्रशासनात मोठी खळबळ उडाली. तर दुसरीकडे नागरिकांना मात्र दिलासा मिळाला. “आमदार साहेब खरेच जनतेसाठी लढणारे आहेत. आमचे दुःख त्यांनी ऐकले आणि थेट कारवाई केली,” अशा प्रतिक्रिया रुग्ण व नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!