Join WhatsApp group

कावड यात्रेत डीजेच्या आवाजावर पोलीस प्रशासनाचा ताबा राहणार का?

Photo of author

By Sarkarmzanews

Share

न्यूज डेस्क : दिनांक १७ ऑगस्ट २५ : कावड यात्रा सुरू होताच ठिकठिकाणी डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने वातावरण दणाणून जाते. डीजे वाजवणे ही आजच्या समाजात फॅशन झाली असून कोणताही कार्यक्रम डीजेविना पूर्ण होत नाही. मात्र, या कर्णकर्कश आवाजामुळे होणाऱ्या त्रासाकडे पोलीस प्रशासन वारंवार डोळेझाक करत असल्याचे चित्र दिसते.

मोठ्या आवाजात वाजणारा डीजे हा केवळ नागरिकांच्या शांततेचा भंग करत नाही, तर आरोग्यालाही धोका निर्माण करतो. लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांना होणाऱ्या त्रासाची प्रशासनाला कल्पना असूनही कारवाई केली जात नाही, हे धक्कादायक आहे.

कायद्यानुसार ठराविक डेसिबलपेक्षा जास्त आवाजात डीजे वाजवणे गुन्हा आहे, तरीही यात्रेदरम्यान पोलिसांकडून नियमांची अंमलबजावणी होत नाही. काही ठिकाणी तर पोलिसांच्या उपस्थितीतच डीजे वाजवले जातात, हे प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. आता या वर्षी कायद्याचे पक्के पोलिस अधीक्षक अर्चित चांडक या वर नियंत्रण ठेवणार का?

👉 प्रश्न नागरिकांचा :

पोलीस प्रशासन नियमांची अंमलबजावणी फक्त कागदावरच करते का?

डीजेच्या आवाजामुळे होणाऱ्या आरोग्याच्या नुकसानीसाठी जबाबदार कोण?

पोलीस प्रशासनाने कारवाई करण्याऐवजी उद्या मौन बाळगेल का?

धार्मिक श्रद्धा आणि परंपरेला कुणी विरोध करत नाही, मात्र कावड यात्रेच्या नावाखाली होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाला मोकळा सुळसुळाट देणे हे प्रशासनाचे अपयश नेहमी दिसते.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!